पंचवटी : आस सोशल वेल्फेअर आणि लाइवलीहूड फाउण्डेशन महिला बचतगटातर्फे इंद्रकुंड येथील पलुस्कर सभागृहात बुधवारी राखी मेळावा संपन्न झाला. रक्षाबंधनानिमित्त महिलांना राखी बनविण्याचे साहित्य वाटप करून मार्गदर्शन करण्यात आले.पेठरोड परिसरातील महिलांनी स्वत: राख्या तयार करून एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. महिलांना घरगुती रोजगार उपलब्ध होऊन प्रत्येक महिला पायावर उभी राहून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकेल, असे उपक्रम फाउण्डेशनने उपलब्ध करून दिले आहे. या राखी मेळाव्यात बचतगटाकडून रु द्राक्ष, गोडा, ब्रेसलेट, डायमंड, अशा विविध राख्या महिलांनी बनविल्या. कार्यक्रमास नगरसेवक वत्सला खैरे, वैशाली भोसले, आशा तडवी, आस फाउण्डेशनचे अध्यक्ष मुकुंद गांगुर्डे, नंदू पवार, पंचवटीचे पोलीस निरीक्षक मधुकर कड, अविनाश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
आस सोशल वेल्फेअरतर्फे राखी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:11 AM