शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:18 AM

इगतपुरी तालुक्यातील मनसेप्रेणीत राजयोग प्रतिष्ठानने अध्यक्ष आत्माराम मते यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी तालुक्यातील अनाथ, गोरगरीब मुलांसोबत सण, उत्सव साजरे करत ...

इगतपुरी तालुक्यातील मनसेप्रेणीत राजयोग प्रतिष्ठानने अध्यक्ष आत्माराम मते यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी तालुक्यातील अनाथ, गोरगरीब मुलांसोबत सण, उत्सव साजरे करत या मुलांना शालेय साहित्य, कपडे तसेच विविध प्रकारची मिठाई आदींसह विविध प्रकारच्या भेटवस्तू देत आदर्श निर्माण केला आहे. यावर्षी देखील आधारतीर्थ आश्रमातील अनाथ व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत रक्षाबंधन सण साजरा करत येथील मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त जवान विजय कातोरे यांनी या अनाथ व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत हितगुज करत त्यांना मार्गदर्शन करत आधार दिला. याप्रसंगी डॉ. प्रशांत मुर्तडक, माजी सैनिक विजय कातोरे, जिल्हा उपाध्यक्ष ललित मुळाणे, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, गोविंद ढगळे, ग्रामपंचायत सदस्य व मनविसेचे तालुकाध्यक्ष दीपक कसबे, वैभव दातीर, ईश्वर गवते आदींसह आश्रमातील कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो- २३ राजयोग

राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत रक्षाबंधन सण साजरा करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते. समवेत मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश खांडबहाले, माजी सैनिक विजय कातोरे, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे व इतर पदाधिकारी.

230821\23nsk_5_23082021_13.jpg

फोटो- २३ राजयोग राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील आधारतिर्थ आश्रमातील  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत रक्षाबंधन सण साजरा करतांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते. समवेत मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश खांडबहाले, माजी सैनिक विजय कातोरे, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे व इतर पदाधिकारी.