शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

नाशिकमध्ये 'मॉब लिंचिंग'चा मुस्लिमांकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 3:55 PM

देशातील विविध भागांमध्ये घडणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये तरुणांचा बळी जात आहे. देशभरातून मॉब लिंचिंगचा निषेध करण्यात येत आहे.

ठळक मुद्देदेशभरातून मॉब लिंचिंगचा निषेध करण्यात येत आहे. मॉब लिंचिंग विरोधात जुन्या नाशकतील चौक मंडईतून सोमवारी सकाळी मोर्चा काढण्यात येणार आहे.मोर्चाचे आयोजन मुस्लिम दलित संघर्ष समितीने केले आहे.

नाशिक - देशातील विविध भागांमध्ये घडणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये तरुणांचा बळी जात आहे. देशभरातून मॉब लिंचिंगचा निषेध करण्यात येत आहे. वडाळा गावातील जामा मशिदीत जुम्माच्या विशेष नमाज नंतर देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी तसेच देशाची कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी  तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या समाजकंटकांचा निषेध नोंदविण्यासाठी छोटेखानी पद्धतीने निषेध सभा घेण्यात आली.

मशिदीचे इमाम मौलाना जुनेद आलम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपस्थित मुस्लिमांनी मूक निषेध नोंदविला. काही दिवसांपूर्वीच झारखंड राज्यातील सराईकेला जिल्ह्यात तबरेज अन्सारी नावाच्या युवकाला चोरीच्या संशयावरून जमावाने एकटे गाठून गंभीर मारहाण केली होती. या मारहाणीत त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट लाट उसळली असून ठिकाणी निषेध होत आहे. 

देशातील जमाव हल्ले थांबवा अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे .या पार्श्वभूमीवर वडाळा गावातील गौसिया मशिदीच्या आवारात जुम्माच्या नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते. धर्मगुरूंच्या सुचनेप्रमाणे कुणीही घोषणाबाजी न करता केवळ मूक निषेध नोंदविला. जमाव हल्ले करून निष्पाप नागरिकांना मारणार्‍यांचा सरकारने त्वरित बंदोबस्त करावा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी आणि या देशात कायदा व सलोका कायमस्वरूपी राखला जावा यासाठी राज्यकर्त्यांनी कठोर पावले उचलावी अशी मागणी करण्यात आली. 

मौलाना जुनेद आलम यांनी प्रार्थना करत भारताच्या प्रगतीसाठी व कायदा व्यवस्था टिकून राहण्यासाठी विशेष दुवा मागितली यावेळी उपस्थितांनी आमीन म्हणून प्रतिसाद दिला सुरक्षेच्या दृष्टीने बाहेर सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सुमारे वीस मिनिटात या निषेध सभेत समाजकंटकांनी विरुद्ध कायदेशीर कारवाई करून धडा शिकवावा अशी मागणी करण्यात आली.

सोमवारी दलित-मुस्लिम मोर्चा

मॉब लिंचिंग विरोधात जुन्या नाशकतील चौक मंडईतून सोमवारी सकाळी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात दलित- मुस्लिम बांधव जिल्हाभरातून सहभागी होणार आहेत. मोर्चाचे आयोजन मुस्लिम दलित संघर्ष समितीने केले आहे. मोर्चा जुने नाशिकमधून सुरू होऊन जिपीओ रस्त्याने ईदगाह मैदानावर पोहचणार आहे. मोर्चात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकMuslimमुस्लीम