एकलहरे : येथील नाशिक औष्णिक वीज केंद्र वसाहतीत आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, पर्यावरणाचा संदेश घेऊन, रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.अधिकारी मनोरंजन केंद्र व कामगार मनोरंजन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनासाठी वॉक फॉर एन्व्हायर्न्मेंट रॅलीच्या माध्यमातून प्रभातफेरी मंगळवारी (दि.३०) आयोजित केली होती. सकाळी ७ वाजता प्रभातफेरीला सुरुवात झाली. सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार व कंत्राटी कर्मचारी यांच्यासह नाशिकरोड भागातील ज्येष्ठ नागरिक सहकुटुंब उपस्थित होते. विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्या हस्ते रॅलीची सुरु वात करण्यात आली. शक्तिमान क्र ीडा संकुल येथून या प्रभातफेरीला सुरु वात झाली आणि संपूर्ण वसाहतीत फिरून ही फेरी परत शक्तिमान क्र ीडा संकुलात संपन्न झाली. या फेरीदरम्यान ‘पाणी म्हणजे जीवनाची हमी’, ‘पाण्याविना जीवन नाही’, ‘पाणी वाचवा,जीवन वाचवा’, अशा घोषणा देण्यात आल्या.पर्यावरण वाचवा, झाडे लावा, पाणी आडवा, पाणी जिरवा, वीज वाचवा हा संदेश रॅलीच्या निमित्ताने देण्यात आला. या रॅलीमधे अधीक्षक अभियंता मनोहर तायडे, शशांक चव्हाण, अनेक कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी, याबरोबरच सार्थक ज्येष्ठ नागरिक संघ, परमानंद ज्येष्ठ नागरिक संघ, मेहनत मॉर्निंग वॉक गु्रप, ज्ञानेश्वर माउली ज्येष्ठ नागरिक संघ, महानिर्मिती सेवानिवृत्त संघटना यांनी विशेष सहभाग नोंदवला.वॉक फॉर एन्व्हायर्नमेंट रॅलीच्या माध्यमातून अनेक ज्येष्ठ नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले. सध्या तीव्र उन्हाळा असल्यामुळे सर्वत्र पाणी टंचाई जाणवते. पाण्याचे योग्य नियोजन व नियंत्रण करण्यासाठी पाणी अडवा-पाणी जिरवा, वृक्ष लावा-वृक्ष जगवा, पर्यावरणाचा ºहास थांबवा, झाडे लावा-निसर्ग वाचवा याबरोबरच विजेची बचत करण्यासाठी वीज वाचविण्याचा संदेशही देण्यात आला. यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.- उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, एकलहरे वीज केंद्रज्येष्ठ नागरिकांना एकलहरे वसाहतीतील वॉक फॉर एन्व्हायर्नमेंट रॅलीत सहभागी होण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करु न दिली.त्यासाठी आम्हाला ने-आण अरण्यासाठी बसची व्यवस्थाही केली. रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण वीज केंद्राची वसाहत पाहिल्यावर येथील आल्हाददायक वातावरणामुळे मन प्रसन्न झाले. या रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण व पाणी वाचविण्याचा संदेश देण्यात आला.- एस. एस. वाणी, अध्यक्ष, परमानंद ज्येष्ठ नागरिक संघवॉक फॉर एन्हायर्नमेंटच्या निमित्ताने एकलहरे वसाहतीत प्रथमच येण्याचा योग आला. येथील पर्यावरणपूरक वातावरण, प्लॅस्टिकमुक्त परिसर, शून्य कचरा, शून्य गळती, ऊर्जा व जलसंवर्धन, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, रोपवाटिका, पिस पार्क उद्यानाचे सौंदर्य पाहून मन प्रफुल्लित झाले. शहरापासून काही अंतरावर ग्रामीण भागात अशाप्रकारचे उपक्र म जोपासणे ही कौतुकास्पद बाब आहे. विशेष म्हणजे आम्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहन उपलब्ध करून देऊन पर्यावरण रॅलीत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली.- हरिदास कुंटे, सेवानिवृत्त अधिकारी, मेहनत मॉर्निंग वॉक ग्रुप, नाशिकरोड
कामगार दिन, महाराष्ट्र दिनानिमित्त पर्यावरणाच्या संदेशासाठी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 12:05 AM