शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जागतिक हिवताप दिनानिमित्ताने रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:20 AM

जागतिक हिवताप दिनानिमित्ताने शहरातून हिवताप निर्मूलन जनजागृती रॅली काढण्यात आली. नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन करण्याबरोबरच ‘हिवताप झिरो करू या’, अशा घोषणा देत शहरातून रॅली काढण्यात आली.

नाशिक : जागतिक हिवताप दिनानिमित्ताने शहरातून हिवताप निर्मूलन जनजागृती रॅली काढण्यात आली. नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन करण्याबरोबरच ‘हिवताप झिरो करू या’, अशा घोषणा देत शहरातून रॅली काढण्यात आली.जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा हिवताप कार्यालय, जिल्हा रुग्णालय व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हिवताप जनजागरण सप्ताहा अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. त्र्यंबके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे आदी उपस्थित होते.याप्रसंगी हिवतापाच्या जनजागरणतेची शपथ घेण्यात आली. रॅलीची सुरु वात जिल्हा रुग्णालयापासून जिल्हा परिषद, गंजमाळ सिग्नल, शालिमार सीबीएसमार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालयात येऊन रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये आरोग्य सेवक व सेविका यांनी सहभाग घेतला. रॅलीमध्ये कर्मचाऱ्यांनी हिवताप जनजागरणाच्या घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधले. विविध माध्यमांचा वापर करून जिल्ह्यामध्ये जनजागरण सप्ताह सुरू करण्यात आला. ‘हिवताप झिरो करू, माझ्यापासून सुरुवात करू’ असे यंदाचे घोषवाक्य असल्याचेही जाहीर करण्यात आले.डासांची उत्पत्ती रोखण्याबाबत माहितीजास्तीत जास्त नागरिकांनी हिवतापविषयी माहिती घेऊन आपला परिसर, आपली घरे डासविरहित कशी राहतील, त्यांची उत्पत्ती कशाप्रकारे कमी होईल याकडे सर्व लोकांनी गंभीरतेने बघितले पाहिजे व इतरांना याविषयी माहिती दिली पाहिजे, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्य