देवळा : चांदवड-देवळा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रचारार्थ आठवडे बाजाराचे औचित्य साधत ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला.डॉ. दौलतराव आहेर सभागृहात सभा घेण्यात आली. पाच वर्षांत मतदारसंघात रस्ते, शेतीसिंचन आदी केलेली कामे तसेच भावी पिढीला डोळ्यासमोर ठेवून उभारलेली वाचनालये, क्रीडा संकुल या कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली असून, त्या विकासकामांच्या बळावर मी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात असल्याचे डॉ. राहुल आहेर यांनी यावेळी सांगितले. मागील निवडणुकीचे प्रमुख शिलेदार असलेले स्व. डॉ. दौलतराव आहेर, कृष्णा आहेर, संतोष सूर्यवंशी, पंकज निकम, सुरेश भदाणे, रामदास देवरे, डॉ. शशिकांत आहेर यांची उणीव या निवडणुकीत भासणार असल्याचे आमदार डॉ. आहेर यांनी सांगताच सभागृह भावुक झाला होता. याप्रसंगी शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष उदयकुमार आहेर, ह.भ.प. संजय धोंडगे, भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख सुनील पवार, देमकोचे चेअरमन जयप्रकाश कोठावदे, ज्येष्ठ मार्गदर्शक बाबूराव निकम, सरपंच परिषदेचे अध्यक्ष विजय पगार, पंचायत समितीचे माजी सभापती केदा शिरसाठ, रतन पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रचार रॅलीत मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष सतीश देशमुख, पवन अहिरराव, किशोर आहेर, मनोज आहेर, नंदू जाधव, अनिल आहेर, नदीश थोरात, समाधान सोनजे, प्रकाश थोरात, दौलत खैरनार, रामदास जैन, प्रवीण मेधने, तुषार भदाणे, चंद्रशेखर भदाणे, सतीष बच्छाव, धनंजय आहेर संजय कानडे, अण्णा पाटील, बापू देवरे, सुनील देवरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.आठवडे बाजारात मतदारांशी साधला संवादडॉ़ राहुल आहेर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आठवडे बाजारातील विक्रेते तसेच ग्राहक मतदारांशी संवाद साधत मतदानाचे आवाहन केले़ यावेळी डॉ़ आहेर यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असे आश्वासन उपस्थित नागरिकांना दिले़