नाशिकरोड : प्रभू उठला आहे, खचित उठला आहे, येशू मसिहा की जय अशा घोषणा देत प्रभू येशूचे भक्तिगीत गात जेलरोड परिसरातून इस्टर संडेनिमित्त ख्रिस्ती बांधवांनी रॅली काढली होती.इस्टर संडे सणानिमित्त रविवारी संत फिलीप चर्चच्या वतीने नाशिक विभागातील सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीने पुनरुत्थान (इस्टर) सणानिमित्त प्रार्थना करण्यात आली़ तसेच जेलरोड नारायणबापू चौकातून रविवारी सायंकाळी रॅली काढण्यात आली होती. जेलरोड नारायणबापूनगर चौकातून सुरू झालेल्या रॅलीचा सैलानी बाबा स्टॉप, शिवाजीनगर, इंगळेनगर, कोठारी कन्या शाळा, बिटको चौक मार्गे मुक्तिधामसमोरील संत फिलीप चर्च येथे समारोप झाला. रॅलीमध्ये ख्रिस्तीबांधव, महिला, युवक, युवती, मुले सहभागी झाली होती.शुभवार्ता सांगण्यासाठी काढतात रॅलीप्रभू येशूला क्रुसावर चढवून मारण्यात आले. प्रभू येशूंना शुक्रवारी मारण्यात आल्याने उत्तम शुक्रवार म्हणून सर्वत्र हा सण पाळण्यात येतो. त्यानंतर तिसऱ्या दिवशी प्रभू येशू जिवंत झाले. म्हणून पुनरुत्थान सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. येशू मरणातून पुन्हा उठला आहे ही शुभवार्ता सर्वांना सांगावी म्हणून रॅली काढण्यात येते.
जेलरोडला ‘इस्टर संडे’निमित्त रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:28 AM