नाशिक : मोटार स्पोर्ट्स क्लब व पीट स्टॉप मोटर स्पोटर्स क्लब आयोजित एमएफआर टू व्हिलर स्पर्धेतील अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक अशा स्पर्धेत नाशिकसह पुणे आणि इंदोरच्या बाइकस्वारांनी नेत्रदीपक अशी कामगिरी करीत रॅलीचा थरार अनुभवला. हॉटेल एक्स्प्रेस इनचे महाव्यवस्थापक ब्लान्की डेरील, यांच्या हस्ते रॅलीस झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी राजेंद्रकुमार परदेशी, प्रदीप म्हसकर, एमआरएफचे मुरली मधुसुदन, के. प्रशांत, श्रीकांत करानी, रवि शामदासानी, प्रणित पेरूमल, श्याम कोठारी उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल-इम्पोर्टेड बाइक गट- के. पी. अरविंद, धवल टोके, पुणे आणि अशिष रावराणे, पुणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. १३० सीसी ते १६५ सीसी गट- सोहल अहमद, के सचिन, निशीत झवेरी, नाशिक यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. १६६ ते २६० सीसी गट- व्हीएस नरेश, अब्दूल वाहिद आणि युवा कुमार यांनी यश मिळविले. स्कूटर गट- शमिम खान, हितेन ठक्कर आणि सय्यद आसिफ अली यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. (प्रतिनिधी)
रॅलीचा थरार
By admin | Published: June 01, 2015 1:45 AM