नाशिकरोड : जागतिकमहिला दिन परिसरातील विविध शाळा, महाविद्यालय, संस्था आदींच्या वतीने विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, देवळाली कॅम्प परिसरातील संस्थांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जेलरोड येथील व्हिजन अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये हेल्दी मदर-हेल्दी फॅमिली या संकल्पनेवर आधारित झुंबा फिटनेस डान्सचे प्रात्यक्षिक व कार्यशाळा पार पडली. सूत्रसंचालन दीपाली भट्टड व अनिता जगताप यांनी केले. यावेळी अध्यक्ष अॅड. अंकिता मुदलियार, मंदाकिनी मुदलीयार, कीर्ती मुदलीयार , मुख्याध्यापक सुनिथा थॉमस, जयश्री बोरोले, सुवर्णा झलके, कल्याणी भोसले, सुरेखा तायडे, मेघा कनोजिया, स्नेहा रूपारेल, श्रद्धा डांगे, आमना खान, सारा खान, प्रीती उदावंत उपस्थित होते. महाराष्टÑ नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रिना सोनार यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर, वकील, रेल्वे विभाग, एसटी महामंडळ, महिला पोलीस, शिक्षिका, रुग्णालय परिचारीका, सफाई महिला कामगार आदींचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अरुणा पाटील, शकुंतला भागवत, धनशरी ढोले, शोभा पंडित, नीलिमा वडनेकर, गीता कटारिया, छाया नाडे, पूजा धुमाळ, सुलभा कदम, संगीता सोनवणे आदी उपस्थित होते. नाशिकरोड महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या वतीने अॅड. प्रेरणा देशपांडे यांचा ‘मी द्रौपदी बोलतेय’ या एकपात्री प्रयोग ऋतुरंग भवनमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मसापचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, कार्यवाह रवींद्र मालुंजकर, सुदाम सातभाई, दशरथ लोखंडे, शिवाजी सातभाई, ऋतुरंगचे प्रकाश पाटील, रंगकर्मी राजू पत्की आदी उपस्थित होते. प्रारंभी वर्षा देशमुख यांनी अॅड. देशपांडे व पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक ज्योती कदम यांनी केले. स्वागत मंगला सातभाई यांनी केले. सूत्रसंचालन रेखा पाटील व आभार वृंदा देशमुख यांनी मानले. पसायदान योगीता मिंदे यांनी सादर केले. यावेळी कामिनी तनपुरे, अलका अमृतकर, राहुल बोराडे, महेश वाजे, सुरेखा गणोरे, वासंती ठाकूर आदिंसह रसिक उपस्थित होते. रुसी इराणी सेंटरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त डिव्हाइन बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अनिता रेवडेकर यांच्या हस्ते मुख्याध्यापक स्वाती गायकवाड, मीना वाघ, राणी लखन, माधवी जाधव, सुनीता वाघ, प्रीती घुगे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक स्वाती गायकवाड यांनी रुसी इराणी संस्थेची माहिती दिली. कार्यक्रमास डिव्हाईन संस्थेच्या सदस्य, रुसी इराणी संस्थेच्या शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
नाशिकरोड-देवळाली कॅम्पला महिला दिनानिमित्त रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:29 AM
नाशिकरोड : जागतिकमहिला दिन परिसरातील विविध शाळा, महाविद्यालय, संस्था आदींच्या वतीने विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देझुंबा फिटनेस डान्सचे प्रात्यक्षिक व कार्यशाळाकार्यालयात जाऊन सत्कार करून शुभेच्छा