मार्चनंतरचे मानधन देण्याचे आश्वासन
नाशिक : अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आता आरोग्यातील आशा कर्मचाºयांच्या आशा पल्लवित झाल्या असून, प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सोमवारी (दि. ९) जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन केले.दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी मार्चनंतरचे प्रलंबित मानधन तत्काळ देण्याचे आश्वासन मोर्चेकºयांना दिले. आयटक संलग्न राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. संघटनेच्या मागण्यांमध्ये दरमहा १५ हजार रु पये मानधन द्या, थकीत मानधन वेळेवर मिळावे, कुष्ठरोग सर्वेक्षण व लसीकरणासाठी दररोज किमान ३०० रु पये भत्ता देण्यात यावा, मेडिकल किट, स्टेशनरी, एनबीएचसी अर्ज पुरवठा करण्यात यावा, आरोग्य खात्यातील रिक्त जागांवर आशांची नियुक्ती करावी, आशा कर्मचाºयांना दरमहा ३०० रु पये रिचार्ज मोबदला द्या, आरोग्य विमा योजनेचा मोफत लाभ देण्यात यावा. या कर्मचाºयांकडून विनामोबदला काम करून घेणे त्वरित बंद करावे. आशांना दरमहा एक हजार रु पये मानधन व दिवाळीला भाऊबीज भेट देण्याचे आश्वासन दिले होते. यंदाच्या दिवाळीत या आश्वासनांची पूर्ती न केल्यास जानेवारी २०१८ पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा आयटक संघटनेने दिला आहे. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष राजू देसले, संघटक विजय दराडे, माया घोलप, सुमन बागुल, वैशाली कवडे, धनश्री भगत, अर्चना गडाख, छाया खैरनार, दीपाली कदम, मनीषा खैरनार, रूपाली सानप, स्नेहल बुडूख, नंदा ठाकरे, कांता ठाकरे, सुरेखा खैरनार आदी महिला उपस्थित होत्या.मानधन सातत्याने थकीतराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या (आशा) व गटप्रवर्तक खेडोपाडी काम करतात. आशा व गटप्रवर्तक अल्प मानधनावर काम करतात. मानधन सातत्याने थकीत राहाते, तसेच शासकीय जिल्हा रु ग्णालय, ग्रामीण रु ग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा कर्मचाºयांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. आदि मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़