कळवण : रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडली असून, प्रभाव संपूर्ण जगात पसरला आहे. प्रभू श्रीराम हे मर्यादा-पुरुषोत्तम आहे. मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व भूमिकांचा परमोच्च, उत्तुंग आदर्श म्हणजे श्रीप्रभू रामचंद्र आहेत. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श पती, आदर्श नेता या विविध गुण समुच्चयाचे सांस्कृतिक प्रतीक असणाऱ्या रामाला म्हणूनच मर्यादा-पुरुषोत्तम म्हटले जात असल्याचे रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी सीताहरण कथेदरम्यान सांगितले.स्व. सुशीलाबाई शिरोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने कळवण येथील आनंद सागर बहुउद्देशीय संस्था, सुनील शिरोरे व परिवाराच्या वतीने रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून सांगितल्या जाणाºया श्रीरामकथा सोहळ्याच्या पाचव्या दिवशी सीताहरण कथा ऐकण्यासाठी भाविकांनी शहरातील शिवाजीनगर येथील रामलीला मैदानावर गर्दी केली होती. श्रीराम कथेचे संयोजक कमकोचे माजी अध्यक्ष सुनील शिरोरे, विलास शिरोरे, नितीन शिरोरे यांनी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे स्वागत केले त्यानंतर रामजन्म कथा सोहळ्यास प्रारंभ झाला.राम काळात खर्या अर्थाने सामाजिक समरसता होती जातीपातीचे लवलेश ही कोणाच्या मनात नव्हता.अयोध्येतून राम वनवासात जातात तेव्हा शोकाकुल झालेली अयोध्या नगरी, राजा दशरथाची केविलवाणी अवस्था, श्रावण बाळाच्या आई वडीलांची आठवण, दशरथ राजाचा अंत्यविधी, शूर्पनखा वंश, सीता हारण,जटायू पक्षाची लढाई करु न स्त्री रक्षणाची जबाबदारीचे महत्व विशद करु न आपण तर मानव आहोत आपल्या देशातील माता बिहणीचे रक्षण करा त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी निर्मल करा हीच खरी भाऊबीज असेल असे रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी सांगितले.रामायण म्हणजे आदर्श जीवनप्रणाली आहे. पितृभक्ती कशी असावी, हे रामाकडे पाहून कळतं, त्याग कसा असावा हे भरतामध्ये पाहायला मिळतं. बंधुप्रेम कसं असावं हे लक्ष्मणाच्या रूपाने दिसून येतं. राम हा केवळ आदर्श पुत्र नव्हता तर तो आदर्श पती, भाऊ, शिष्य, मित्रही होता. इतकंच नाही तर तो आदर्श शत्रूही होता. रामाच्या इतर गुणांच्या खूप कथा ऐकायला मिळतात. मात्र शत्रूचाही रामावर विश्वास होता. रामायणात आपण नेहमी ऐकलेल्या कथांपेक्षा रामायणातील अनेक विलक्षण प्रसंग आणि त्यातील तत्त्वज्ञानाची उकल ढोक महाराज मोठ्या खुबीने करतात.
समुच्चयाचे प्रतीक म्हणून राम मर्यादापुरुषोत्तम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 1:08 AM
कळवण : रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडली असून, प्रभाव संपूर्ण जगात पसरला आहे. प्रभू श्रीराम हे ...
ठळक मुद्देरामायणाचार्य रामराव महाराज ढोक