मालेगाव : रमाई घरकुल आवास योजनेत लाभार्थींना महापालिका प्रशासन हेतुपुरस्सर डावलत असल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.यावेळी मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. समाज कल्याण विभागातर्फे रमाई घरकुल आवास योजना सुरू करण्यात आली आहे. महापालिका पात्र लाभार्थींना या योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहे. पात्र लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.आंदोलनात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भारत चव्हाण, दिलीप अहिरे, दादाजी महाले, शहर अध्यक्ष राजेश पटाईत, बापू चव्हाण, मिलिंद गरूड, राकेश देवरे, राहुल पवार, प्रदीप अहिरे, आनंद खैरनार, विष्णू शेजवळ, बाळू बिºहाडे आदिंसह पदाधिकारी सहभागी झाले होते.
रमाई घरकुल योजनेप्रश्नी रिपाइंचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:45 AM
मालेगाव : रमाई घरकुल आवास योजनेत लाभार्थींना महापालिका प्रशासन हेतुपुरस्सर डावलत असल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
ठळक मुद्दे पात्र लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.