नाशिक : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्धांना निवारा उपलब्ध होण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या रमाई आंबेडकर आवास योजनेची वासलात लागली असून, या योजनेत अंतिमत: घरकुल उभारलेल्या एकाच लाभार्थीला पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे. संपूर्ण योजनेत ३३ कुटुंबांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असली तरी त्यातील केवळ २१ लाभार्थींपर्यंत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान पोहोचले आहे. शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील गरिबांना त्यातही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी शासनाने रमाई आंबेडकर आवास योजना आखली आहे. ज्यांची स्वमालकीची झोपडी, कच्चे घर अथवा मोकळी जागा असेल त्यांना घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले जाते.यासंदर्भात गेल्यावर्षी ७ जानेवारीस घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार पात्र व्यक्तीला घरकुल बांधण्यासाठीच नव्हे तर दुरु स्तीसाठी अडीच लाख रु पयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या सूचनेनुसार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण समिती स्थापन करण्यात आली आहे. या योजनेकरिता शासनाकडून आतापर्यंत २ कोटी ५६ लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळाले असले तरी लाभार्थी निश्चित करण्यास महापालिका वेळखाऊपणा करीत असल्याने लाभेच्छुकांना लाभ मिळत नाही. तसेच या योजनेचा लाभ संंबंधितांपर्यंत पोहण्यास अडथळे निर्माण होत आहेत.३३ कुटुंबांनाच लाभसदरची योजना सुरू झाल्यापासून जेमतेम ३३ कुटुंबांनाच लाभ मिळाला आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यातील एक लाख रुपयांचे अनुदान या ३३ कुटुंबांना मिळाले आहे. मात्र, २१ लाभार्थ्यांनाच योजनेच्या दुसºया टप्प्यातील ८० हजार रु पयांचे अनुदान मिळाले आहे. योजनेच्या उर्वरित २० हजारांच्या अनुदानाचा अंतिम टप्पा लाभार्थ्याने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला सादर केल्यानंतर देणे असले तरी एकच लाभार्थी दाखला मिळवण्यापर्यंत पोहोचल्याने त्यालाच संपूर्ण अनुदानाचा पूर्ण लाभ मिळाला आहे.
रमाई आवासचा अवघा एकच पूर्ण लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:08 AM