गंगापूरगाव : नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या सुरक्षिततेच्या संवेदनशील विषयावर अनेकदा चर्चा होऊनही त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यातच धरणावरील सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याने बंद आहेत. तर बहुतांशी सुरक्षा कर्मचाºयांची मुदत संपली असून, धरणाच्या सुरक्षेसाठी अवघे पाच कर्मचारी असल्याने सध्या धरणाची सुरक्षा रामभरोसे आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणाचे महत्त्व बघता त्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा वेळावेळी चर्चिला गेला आहे. कुंभमेळ्याच्या वेळीदेखील पोलीस यंत्रणेने त्याकडे विशेष लक्ष पुरवण्याची सूचना केली होती. धरणाचा परिसर विस्तीर्ण असून तेथे कोणीही आणि केव्हाही प्रवेश करू शकतो. त्यामुळे अनेकदा पोेहताना धरणातच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आत्महत्यादेखील घडल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर बरीच ओरड झाल्यानंतर जलसंपदा विभागाने सोळा ते सतरा सीसीटीव्ही लावले असून, सध्या हेच सोळा ते सतरा कॅमरे नादुरुस्त असल्याने बंद झाल्याचे समजते. स्थानिक कर्मचाºयांनी वरिष्ठांना याबाबत कळवूनही कॅमरे दुरुस्त झालेले नाहीत. सुरक्षिततेच्या जबाबदारीचे काम ज्यांच्या शिरावर आहे त्या चाळीस ते पंचेचाळीस कर्मचाºयांपैकी काही कर्मचाºयांचा कार्यकाळ संपल्याने सेवानिवृत्त झाल्याने कर्मचाºयांची संख्या कमी झाली असून, सध्या पाच कर्मचारी धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी पेलत आहेत.
गंगापूर धरणाची सुरक्षा रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:29 AM