नाशिक : पालक-शिक्षक संघटनेला विश्वासात न घेता मनमानीपणे शैक्षणिक शुल्कात वाढ करणाºया शाळांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिले आहेत. पालक संघटनेच्या अध्यक्ष सुषमा गोराणे व मिशन एज्युकेशन फेडरेशनच्या पदाधिकाºयांनी जाधव यांना निवेदन सादर केले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा मनमानी करीत असून, बेकायदेशीररीत्या विद्यार्थ्यांची फी वाढ करणे, पालकांना शाळेतून पुस्तके, युनिफॉर्म खरेदी करण्यासाठी सक्ती करणे, ब्रेकफास्ट, लंच इत्यादीसाठी सक्ती करीत आहेत. शिक्षण हक्क कायद्याच्या नियमांचा भंग शाळा करीत असून, पालकांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. शुल्क नियामक कायद्याप्रमाणे शाळेने दोन वर्षांतून एकदाच फी वाढ करावी, असा नियम आहे. सदर फी वाढीसाठी पालक शिक्षक संघाची मान्यता घेण्यात येईल. फी वाढीला मान्यता देताना शाळेच्या गत तीन वर्षांचे ताळेबंद, शिक्षकांचे पगार व इतर अत्यावश्यक खर्च इत्यादी सर्व कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे. हे सर्व तपासून पालक शिक्षक संघाने मान्यता देणे आवश्यक आहे. तसेच शाळांच्या म्हणण्यावरून पालक शिक्षक संघाने फी वाढीला मान्यता दिली तर संघावरही कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात नमूद आहे. असे असतानाही अनेक शाळा संघाला कागदपत्रे दाखवत नाहीत व फी वाढ करतात अशा शाळांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. काही इंग्रजी शाळा पालकांकडून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच सहा महिने अगोदर दहा हजार रुपये कन्फर्मेशन शुल्क आकारतात.
मनमानी फी वाढ करणाऱ्या शाळांवर कारवाई होणाररामचंद्र जाधव : पालक-शिक्षक संघटनेला आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:11 AM
नाशिक : पालक-शिक्षक संघटनेला विश्वासात न घेता मनमानीपणे शैक्षणिक शुल्कात वाढ करणाºया शाळांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिले आहेत.
ठळक मुद्देबेकायदेशीररीत्या विद्यार्थ्यांची फी वाढ करणेशाळेने दोन वर्षांतून एकदाच फी वाढ करावी