मेळाव्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील ३०१ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर १४ शाळांचा उपक्रमशील शाळा म्हणून गौरव करण्यात आला. याप्रसंगी आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक दिलीप ढाकणे, राज्य अध्यक्ष अंकुश काळे, डॉ. भागवत कराड, बीडचे नगराध्यक्ष भूषण क्षीरसागर, महिला आघाडीच्या राज्यप्रमुख मुक्ता पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील बाळासाहेब सानप, विजय चकोर, बाळासाहेब शेळके, सुनील गिते, रामदास कवटे, दशरथ शिंदे, एकनाथ घुले, सुनील गिते, रवींद्र सातव, संदीप सानप, अविनाश खेडकर, रामदास घुगे, सोमनाथ पथवे, सोमनाथ आव्हाड, शांताराम आव्हाड, संदीप लेंडे, प्रशांत हेकरे, धनंजय सूर्यवंशी, गोरक्ष गोर्डे, राजू सानप, नितीन घोडके, ज्ञानेश्वर दराडे, संतोष देशमुख, अण्णासाहेब सांगळे, संजय बोडके, ज्ञानेश्वर सानप, विनायक सानप, गणेश भाबड, पांडुरंग कडाळी, खंडू आव्हाड, दीपक उगले आदी उपस्थित होते.
राज्य आदर्श शिक्षक समितीच्या कार्याध्यक्षपदी रामदास सांगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 7:00 PM