सिन्नर : योगगुरू रामदेव महाराज यांचे येत्या रविवारी (दि.२०) सिन्नरला ‘योगसे राष्ट्र निर्माण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सिन्नर महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाच्या तयारीला पंतजली योगसमिती आणि भारत स्वाभिमान न्यासच्या वतीने तयारीला प्रारंभ झाला असून, त्यासाठी आयोजन समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी मिलिंद गणकर यांनी दिली. रामदेवबाबा कुंभमेळ्याच्या निमित्ताने १९ ते २३ सप्टेंबर या काळात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येत आहेत. रविवारी (दि.२०) सकाळी १० वाजता येथील सिन्नर महाविद्यालयाच्या मैदानावर प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी स्थानिक आयोजन समितीची स्थापना करण्यात आली. आयोजन समितीचे प्रमुख आमदार राजाभाऊ वाजे आहेत. समितीमध्ये विजय झगडे, विठ्ठल उगले, विष्णू गोजरे, कृष्णा वरंदळ, हेमंत नाईक, कृष्णाजी भगत, विवेक चांडक, कैलास क्षत्रिय, उदय सांगळे, भागवत घुगे यांच्यासह सभासद असणार आहेत. पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी सोमवारी (दि.१४) केंद्रीय प्रभारी जयदीप आर्य येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी युवा भारत प्रांतिक सदस्य आनंद कर्नाटकी, तालुका प्रभारी शिवनाथ शिंदे, दत्ता शेळके, किसन आव्हाड, सचिन वाजे, शोभा कर्नाटकी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
रामदेवबाबा यांचा सिन्नरला कार्यक्रम
By admin | Published: September 09, 2015 10:58 PM