मनमाड : गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या मुख्यभागी असलेल्या रामगुळणा नदीमध्ये साचलेला गाळ काढण्याचे काम मनमाड शहर बचाव कृती समितीच्या वतीने लोकसहभागातून करण्यात येत असल्यामुळे रामगुळणा नदीने आता मोकळा श्वास घेतला आहे.रेल्वे पूल ते शिवाजीनगर पुलापर्यंतच्या पाहिल्या टप्प्यात शहरातील असंख्य नागरिकांनी सहभाग घेऊन मोहीम यशस्वी केली आहे. पुढील टप्प्यांमध्ये बंधारे उभारण्यात जनतेने सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून रामगुळणा नदीपात्राची स्वच्छता लोकसहभागातून करण्यात आली आहे. यामध्ये लोकसहभाग असणे आवश्यक असून, लोकांनी यामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. उपक्रम यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी, राजाभाऊ पारीक, बी.टी. पदमने, अनिल दराडे, विकास काकडे, निर्मल भंडारी, राजकमल पांडे, सलीम सोनावाला, पाटीलसर आदिंनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
रामगुळणा नदीने घेतला मोकळा श्वास
By admin | Published: September 10, 2014 10:12 PM