लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : सियावर रामचंद्र की जय... अयोध्यापती श्रीरामचंद्र की जय...असा जयघोष करीत अयोध्येतील राममंदिर उभारणीच्या कार्याचा भूमिपूजन सोहळ्याचा जल्लोष जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आला.त्र्यंबकेश्वरला श्रीस्वामी सागरानंद सरस्वती यांच्या आश्रमात येथील दहा अखाड्यांच्या साधु संत महंतांनी अयोध्येस पुजा चालु असतांना थेट प्रक्षेपणाने एकत्र बसुन पायाभरणी समारंभाचे दृश्य पाहात अत्यानंदाने बाहेर येउन भगवान श्रीरामचंद्रजी की जय ! रामलल्लाजी की जय !! श्री रामभक्त हनुमान की जय असा एकच जयघोष केला.श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये भगवान श्रीरामाचे एकमेव मोठे मंदीर असुन या मंदीराची ट्रस्ट तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे राम मंदीर देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण संस्थेतर्फे बांधण्यात आले आहे. येथे जवळपास १४/१५दिवस श्रीराम जन्मोत्सव सोहळा ट्रस्टच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो.भगवान श्रीरामाची मुर्ती खाली घेउन अनेकांनी पुजा अर्चा पवमान अभिषेक केला. येथील पाचअळीतील भगवान श्रीरामाचे पाचआळी येथे मंदीर आहे.या मंदीरात धार्मिक विधी जल्लोषात सुरु असुन श्रीराम मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कळमकरांनी पवमान अभिषेक केला. यावेळी घरोघर भगवान श्रीरामाच्या मुर्तीची पुजा करण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या अनेक हनुमान मंदिरात हनुमान राम भक्तांनी पूजाअर्चा केली.भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरावर गुढ्या तोरणे विद्युत रोषणाई केली होती. अनेकांनी रांगोळ्या चितारल्या होत्या. येथील भाजपचे शहराध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी आपल्या घरावर गुढी तोरण उभारु न रांगेळीने श्रीरामाची तसवीर चितारली होती. भगवान श्रीरामाच्या मुर्तीची पुजा करु न पवमान अभिषेक केला.मालेगावच्या श्रीराम मंदिरात महाआरतीमालेगाव : शहर व तालुक्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील श्रीराम मंदिर रामबाग येथील मंदिरात मंगळवारी रात्री दीप महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी धर्म ध्वजाची स्थापना करण्यात आली. सकाळी विजयाचे प्रतिक म्हणून गुढी उभारण्यात आली.दुपारी ११ वाजता महामस्तकाभिषेक सोहळ्यासह पुजन करण्यात आले. तसेच महाआरती करण्यात आली. यावेळी मंदिराचे पुजारी शंकरलाल तिवारी, मुख्य व्यवस्थापक नेविलकुमार तिवारी, हरिप्रसाद गुप्ता, कैलास शर्मा, राघव तिवारी, कुणाल पारीख, भारती तिवारी, मिनाक्षी तिवारी, तेजस्विनी तिवारी आदि उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिर दर्शन बंद ठेवण्यात आले होते. तसेच घरोघरी भाविकांनी श्रीरामाचे पुजन केले. तर कॅम्पातील श्रीराम मंदिरात श्री बालाजी मंदिर अग्रवाल पंच ट्रस्ट व अग्रवाल समाजाच्या वतीने दुपारी साडेबारा वाजता महाआरती करण्यात आली. सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन कार्यक्रम घेण्यात आला. सावता चौकातील श्रीराम मंदिरात पुजा करण्यात आली.तालुक्यातील टेहरे येथील श्रीराम मंदिरात भजन करुन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शहरातील नागरिकांनी घरोघरी गुढी उभारली होती. भगवे ध्वज लावण्यात आले होते. दिवसभर शहरात आनंदाचे व चैतन्याचे वातावरण दिसून आले.
जिल्ह्यात रामनामाचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 9:43 PM
लोकमत न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : सियावर रामचंद्र की जय... अयोध्यापती श्रीरामचंद्र की जय...असा जयघोष करीत अयोध्येतील राममंदिर उभारणीच्या कार्याचा भूमिपूजन सोहळ्याचा जल्लोष जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आला.
ठळक मुद्देसियाराम रामचंद्र की जय : त्र्यंबकला साधू महंतांचा जल्लोष, मिठाईचे वाटप, अभिषेकासह धार्मिक कार्यक्रम