नाशिक : आयुष्यभर उपेक्षिताचे जीवन जगणाºया ‘त्याही’ माणूस आहेत, ’त्यांना’ही मन, भावना आहेत. नेहमीच नाकारणाºया सुशिक्षित समाजाने आपल्याशी सन्मानाचे किमान चार शब्द बोलावेत, एवढीच त्यांची माफक अपेक्षा! यासाठी त्यांनी बुधवारी (दि.४) परशुराम सायखेडकर नाट्यगृहात चक्क रॅम्प वॉक केला आणि उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली. निमित्त होते प्रवरा मेडिकल ट्रस्ट, धन्वंतरी इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन अॅन्ड टेक्नॉलॉजी, दिशा महिला संस्था, मनमीलन सामाजिक संस्था, वॉव ग्रुप आणि एनजीओ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने वारांगना महिलांसाठी आयोजित अनोख्या रॅम्प वॉक कार्यक्रमाचे!महिला दिनानिमित्त त्यांच्या हक्कांबाबत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव होतो. मात्र आयुष्याच्या एका वळणावर पाय घसरलेली ती तिच्याही नकळत देहविक्रीच्या दलदलमध्ये सापडते. तिचा व्यवसाय ही तिची निवड, जबाबदारी असली तरी स्री म्हणून तिचा सन्मान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या उद्देशाने विविध संस्थांच्या वतीने वारांगना महिलांसाठी ‘स्री म्हणून हवा सन्मान’ हा रॅम्प वॉक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात देहविक्री करणाºया ८ आणि ८ तृतीयपंथी यांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी प्रवरा संस्थेच्या आसावरी देशपांडे म्हणाल्या वारांगना महिलांबद्दल समाजातील दूषित दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. समाजाने त्यांना महिला म्हणून, माणूस म्हणून स्वीकारावे. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बेटरफास्ट लाइफस्टाइलचे संदीप डांगे म्हणाले, देहविक्री करणाºया महिला असो की तृतीयपंथी त्यांच्याविषयी केवळ कुजबूज होते. या विषयावर समोरासमोर बोलणे गरजेचे आहे. सुशिक्षित समाज जर त्यांना नाकारत असेल तर अन्य घटकांकडून काय अपेक्षा ठेवायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याप्रसंगी रॅम्प वॉक करणाºया आशाने (नाव बदललेले) आपल्या भावना व्यक्त केल्या. आयुष्यात प्रथमच अशी संधी मिळाली. कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. काही घटकांनी यासाठी मदतीचा हात दिला हा अनुभव आमच्यासाठी वेगळा होता, असे त्यांनी सांगितले.
वारांगनांनी केला रॅम्प वॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 12:05 AM
नाशिक : आयुष्यभर उपेक्षिताचे जीवन जगणाºया ‘त्याही’ माणूस आहेत, ’त्यांना’ही मन, भावना आहेत. नेहमीच नाकारणाºया सुशिक्षित समाजाने आपल्याशी सन्मानाचे किमान चार शब्द बोलावेत, एवढीच त्यांची माफक अपेक्षा! यासाठी त्यांनी बुधवारी (दि.४) परशुराम सायखेडकर नाट्यगृहात चक्क रॅम्प वॉक केला आणि उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली.
ठळक मुद्दे‘ती’च्या सक्षमीकरणासाठी : तृतीय पंथीयांचा उस्फुर्त सहभाग देहविक्री करणाºया ८ आणि ८ तृतीयपंथी यांनी सहभाग नोंदविला.