नाशिक : मुस्लीम बांधवांचा उपवासांचा पवित्र महिना रमजान पर्वला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त जुने नाशिक, वडाळागाव परिसरातील काही भागांत रस्त्यांवर ‘मिनी मार्केट’ तात्पुरत्या स्वरूपात ठराविक वेळेत थाटले जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवण्याची शक्यता लक्षात घेत वाहतूक मार्गात सायंकाळच्या सुमारास बदल करण्यात आल्याची अधिसूचना उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी जारी केली आहे.मंगळवारी दि.७) रमजान पर्वचा पहिला उपवास (रोजा) असून येत्या ६जूनपर्यंत रमजान पर्व सुरू राहणार आहे. यामुळे जुने नाशिकमधील दुधबाजार, चौकमंडई परिसरात होणारी गर्दीमुळे या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. महिनाभरासाठी दुपारी ४:३० ते सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत शहीद अब्दुल हमीद चौक (दूधबाजार) ते महात्माफुले मंडईजवळील मौलाबाबा दर्गा येथून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूकीसाठी प्रवेश बंद राहणार आहे. भद्रकाली भाजी बाजार, मेनरोड, दहीपूलकडून सारडासर्कलकडे जाणारे वाहनचालक भद्रकाली टॅक्सी स्टॅण्ड येथून पिंपळचौक मार्गे पुढे गंजमाळवरून जातील तसेच त्र्यंबक पोलीस चौकी व गाडगेमहाराज पुतळा येथून वाहने भद्रकाली, दहीपूल परिसरात जातील तसेच फाळकेरोडवरून मौलाबाबा दर्गामार्गे भद्रकालीकडे जाणारी वाहतुक सारडासर्कलवरून गंजमाळ, खडकाळी सिग्नल शालिमारमार्गे पुढे रवाना होतील, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच महात्मा फुले पोलीस चौकी, बागवानपुरामार्गे चौक मंडईमार्गे पिरमोहना कब्रस्तानसमोरून जाणाºया वाहनांना वर नमुद केलेल्या वेळेत प्रवेश बंद करण्यात आला आहे. चौक मंडईकडे जाणारी वाहतुक ही द्वारका सर्कल व टाळकुटेश्वर पुलावरून पुढे जाईल. वाहतूक मार्गातील बदल आपत्कालीन स्थितीत सेवा बजावणारे अग्निशमन दल, रूग्णवाहिका, पोलीस वाहने, वैकुंठरथ यांच्यासाठी शिथिल राहतील असे पोलिसांनी अधिसूचनेत म्हटले आहे. वरील अधिसूचनेचे पालन न करणा-या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.वडाळागावातील रस्ताही बंदरमजान पर्व काळात सायंकाळी ५ वाजेपासून रात्री ८वाजेपर्यंत गौसिया मशिद ते खंडेराव चौकापर्यंतचा मुख्य रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. वरील निर्बंध महिनाभरासाठी लागू राहणार आहे. या मार्गावरही बाजार भरत असल्याने वाहतूक कोंडी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाहतूक बदल करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. यामुळे वाहतूक बदलाची नोंद घेऊन पालन करावे असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.
रमजान पर्व : जुने नाशिक, वडाळा परिसरातील वाहतूक मार्गात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 5:06 PM
मंगळवारी दि.७) रमजान पर्वचा पहिला उपवास (रोजा) असून येत्या ६जूनपर्यंत रमजान पर्व सुरू राहणार आहे. यामुळे जुने नाशिकमधील दुधबाजार, चौकमंडई परिसरात होणारी गर्दीमुळे या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देवडाळागावातील रस्ताही बंद६जूनपर्यंत रमजान पर्व सुरू राहणार आहे