नाशिक : रमजानपर्वाचा पहिला शुक्रवार अर्थात जुम्मा मुस्लीम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला. यानिमित्त दुपारी नाशिक शहर व परिसरातील सर्व मशिदींमध्ये सामूहिकरीत्या नमाज पठण करण्यात आले. मुस्लीम बांधवांची मशिदींमध्ये गर्दी उसळली होती. रमजान इस्लामी कालगणनेतील नववा उर्दू महिना आहे. या महिन्याला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. मुस्लीम बांधव संपूर्ण महिनाभर अल्लाची उपासना करण्यावर भर देतात. इस्लामच्या पाच मूळ स्तंभांपैकी एक असलेल्या रोजा अर्थात उपवास याच महिन्यात केले जातात. रोजा म्हणजे केवळ उपाशीपोटी राहणे नसून, मनापासून संपूर्ण शरीरापर्यंत सर्व अवयवांचा उपवास करणे असे मानले जाते. त्यामुळे वाईट बोलू नये, वाईट ऐकू नये, वाईट बघू नये, कोणाला त्रास देऊ नये, वाईट ठिकाणी जाऊ नये अशा विविध अंगांचा रोजामध्ये समावेश असतो, असे धर्मगुरुंनी जुम्माच्या नमाज पठणापूर्वी दिलेल्या प्रवचनातून सांगितले. संयम, सदाचार, मानवता, करुणा, आपुलकी, बंधुभाव जोपासण्याची हा महिना शिकवण देतो. या महिन्याच्या तिसऱ्या खंडाची प्रतीक्षा न करता सुरु वातीच्या दहा दिवसांमध्ये गोरगरीब, अनाथ, विधवा अशा समाजातील विविध घटकांना दानधर्म करावा, असेही आवाहन मशिदींमधून वा प्रवचनाद्वारे करण्यात आले. शुक्रवारपासून रमजानला सुरु वात झाल्याने मुस्लीम बांधवांचा उत्साह अधिक वाढला आहे. आबालवृद्धांनी दुपारी मशिदींमध्ये नमाज पठण करण्यासाठी गर्दी केली होती. नमाज पठण, कुराण पठण अशा धार्मिक कार्यांना प्राधान्य दिले जाते.
रमजानचा पहिला जुम्मा साजरा सामूहिक नमाज पठण : विविध धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 1:44 AM
नाशिक : रमजानपर्वाचा पहिला शुक्रवार अर्थात जुम्मा मुस्लीम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला.
ठळक मुद्देसर्व मशिदींमध्ये सामूहिकरीत्या नमाज पठण उपवास याच महिन्यात केले जातात