नाशिक : नॅशलन टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) वैद्यकीय विद्याशाखेतील प्रवेशासाठी रविवार (दि. ५) ‘नीट’ परिक्षा घेण्यात येत असून दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत देशभरात ही परिक्षा घेतली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी विविध परीक्षा केंद्रावर गर्दी करून आपली आसन व्यवस्थेविषयी खात्री करून घेतली. त्यामुळे नाशिक शहरातील विविध परीक्षा केंद्रांच्या बाहेर दुपारी बारावाजेपासूनच विद्यार्थ्यांच्या रांगा दिसून आल्या. विशेष म्हणजे शहरातील एका परीक्षा केंद्रात ऐनवेळी बदल होऊन सिम्बॉयसिस स्कूल कॉलेज ऐवजी आता दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये केंद्र स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यामुळे या केंद्रासह इंदिरानगर येथील केंब्रीज स्कूल सारख्या उर्वरित पूर्वनियोजित केंद्रांवर विद्यार्थ्यांनी वेळे आधी उपस्थित राहून परीक्षा केंद्रात प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केला. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजेन्सीतर्फे(एनटीए) एकूण ७२० गुणांची नीट परिक्षा घेण्यात येत असून यात भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांचे प्रत्येकी १८०-१८० गुणांचे प्रत्येकी ४५ प्रश्न, तर जीवशास्त्र विषयात ३६० गुणांचे ९० प्रश्न विचारण्यात येणार आहे नाशिक शहरातील सिम्बॉसीस स्कूल हे केंद्र बदलून आता दिल्ली पब्लिक स्कूल येथे परिक्षा घेण्याचा निर्णय एनटीएने घेतला आहे. या बदलाची विद्यार्थ्यांना प्रसारमाध्यमांमध्ये जाहीरात देण्यासोबतच संकेतस्थळावरूनही सूचना देण्यात आली होती.दरम्यान, मागील परिक्षेदरम्यान अनेक गैरप्रकार समोर आले होते. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी एनटीएतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही काटेकोर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यत आली होती. तसेच परिक्षार्थींना शुज, पूर्ण स्लीव्ह शर्ट, सन गॉगल, घड्याळ, ब्रेसलेट, रिंग, चेन, अंगठी, हार किंवा इतर कोणत्याही प्रकारची दागदागिने घालता येणार नसल्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सकाळी परीक्षेला उफस्थित बहूतांश विद्यार्थ्यांनी हाफ बाह्यांचे शर्ट व टी शर्ट व पायात साधी चप्पल परीधान करून परीक्षा केंद्रात उफस्थित लावल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे पेन, पेन्सिल बॉक्स, स्टेशनरी, मोबाइल व इतर वस्तू परिक्षा केंद्रात नेण्यासही बंदी असल्याने विद्यार्थ्यांनी अशा वस्तू सोबत आणण्याचे टाळले होते. अनेक विद्यार्थ्यांसोबत त्यांचा पालकांनीही परीक्षा केंद्रांच्याबाहेर गर्दी केल्याचे दिसून आले.
नाशिकमध्ये 'नीट' साठी विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रावर रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 1:44 PM
नॅशलन टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) वैद्यकीय विद्याशाखेतील प्रवेशासाठी रविवार (दि. ५) ‘नीट’ परिक्षा घेण्यात येत असून दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत देशभरात ही परिक्षा घेतली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी विविध परीक्षा केंद्रावर गर्दी करून आपली आसन व्यवस्थेविषयी खात्री करून घेतली. त्यामुळे नाशिक शहरातील विविध परीक्षा केंद्रांच्या बाहेर दुपारी बारावाजेपासूनच विद्यार्थ्यांच्या रांगा दिसून आल्या. विशेष म्हणजे शहरातील एका परीक्षा केंद्रात ऐनवेळी बदल होऊन सिम्बॉयसिस स्कूल कॉलेज ऐवजी आता दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये केंद्र स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यामुळे या केंद्रासह उर्वरित पूर्वनियोजित केंद्रांवर विद्यार्थ्यांनी वेळे आधी उपस्थित राहून परीक्षा केंद्रात प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केला.
ठळक मुद्दे 'नीट' साठी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या वेळेआधीच रांगा ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांची खबरदारी परीक्षार्थींसोबत पालकांचीही परीक्षा केंद्राच्या परीसरात गर्दी