मालेगाव : कॅम्प येथील के. बी. एच. विद्यालयात शालांत परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.संस्थेचे समन्वयक, माजी शिक्षक आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अथर्व प्रविण नेरकर, यश गुंजाळ, तेजस जोशी, ललित बच्छाव, सोहम पवार तसेच दिव्यांग विद्यार्थी राजेश्वर धोंडगे या विद्यार्थ्यांचा प्राचार्य अनिल पवार, उपप्राचार्य सुनील बागुल, उपप्राचार्य रविंद्र शिरूडे, पर्यवेक्षक विलास पगार यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य सुनील बागुल, रवींद्र शिरूडे, विलास पगार, प्रा. प्रफुल निकम, जे. एस. कन्नोर, संजय सूर्यवंशी, पांडुरंग शेलार, प्रमोद पिंपळसे, ए. एम. भालेराव, एस. टी .पवार, सचिन लिंगायत, राजेंद्र शेवाळे, राजेश धनवट, जे. एस. बच्छाव, के. वाय. देवरे, जे. जी. शेवाळे, जी. यु. कोकरे, उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेश धनवट यांनी केले. आभार राजेंद्र शेवाळे यांनीमानले. (वा. प्र.)मालेगाव कॅम्प येथील के. बी. एच. विद्यालयात शालांत परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्राचार्य अनिल पवार, उपप्राचार्य सुनील बागूल, रवींद्र शिरूडे, पर्यवेक्षक विलास पगार, प्रा. प्रफुल्ल निकम, जे. एस. कन्नोर, राजेश धनवट, राजेंद्र शेवाळे आदिंसह शिक्षक.
केबीएच विद्यालयात रंगला गुणगौरव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 8:31 PM
मालेगाव : कॅम्प येथील के. बी. एच. विद्यालयात शालांत परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.
ठळक मुद्दे विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.