नाशिक : सकाळच्या कडाक्याच्या थंडीतही अस्सल सुरांची भेट रसिकांना आनंद देऊन गेली. रजिंदर कौर यांच्या स्वर आणि शब्दांतील नजाकतीची अनुभूती शास्त्रीय संगीतातील प्रयोगांची नवी ओळख करून देणारा होता.विश्वास ग्रुपतर्फे ‘सूरविश्वास’चे बारावे पुष्प रजिंदर कौर यांच्या स्वरांनी गुंफले. नटभैरव रागाने त्यांनी मैफलीची सुरुवात केली. शब्द होते ‘लालन तुमसे भली न हो’ एक अनाहत नाद आणि शब्दा-शब्दांतून निथळणारा आशय यातून मैफल रंगत गेली. त्यानंतर ‘दादरा’ सादर केला. ‘सय्या मोरे तोरी बाकी नजरिया’ यातून आर्तता आणि प्रेमाचा, आपुलकीचा स्त्रोत स्वरांतून ओसंडत होता. यानंतर पंजाबी भावभक्तीचा स्वर शब्दमधून सादर केला. भक्ती आणि जीवन जगण्यातला आनंद यातून निनादत होता. ‘सून यार हमारे सजन’ ही विनवणी होती. भैरवीने कार्यक्र माची सांगता झाली. ‘आयी शरण निहारी’तून परमेश्वर भक्तीची आस व्यक्त केली. सुजीत काळे (तबला), कृपा परदेशी (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान सूरविश्वास मैफलीत करण्यात येतो. त्यात महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे रा.शं. दातार नाट्यगौरव पुरस्काराबद्दल दत्ता पाटील यांना रमेश देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कलावंतांचे सन्मान रागिणी कामतीकर, डॉ.मनोज शिंपी, अमर भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.सूर विश्वास कार्यक्रमात गायन सादर करताना रजिंदर कौर समवेत तबल्यावर सुजित काळे, कृपा परदेशी संवादिनीवर