शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

बॅँकांमध्ये दुसऱ्या दिवशीही रांगा

By admin | Published: November 11, 2016 10:40 PM

बॅँकांमध्ये दुसऱ्या दिवशीही रांगा

नाशिक : जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी बँकांसमोर मोठ्या रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी नागरिकांना बॅँकेतून नोटा बदलून न मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले. या प्रकाराने नागरिकांची आर्थिक कोंडी होताना दिसत होती, तर सर्वच क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे.चांदवड : पाचशे व हजार रुपयांच्या नोटा केंद्र शासनाने चलनातून बंद केल्याने गुरुवारी व शुक्रवारी चांदवड शहरातील सर्वच बॅँकांसमोर महिला -पुरुषांच्या रांगा लागल्या होत्या. काही बॅँकेमध्ये पोलीस यंत्रणेमार्फत नियंत्रण ठेवण्यात आले तर ग्राहक व बॅँक कर्मचारी यांच्यात ताणतणावामुळे खटके उडण्याचे प्रकार घडताना दिसत होते. त्यातच कालपर्यंत सहकारी पतसंस्थांमध्ये कर्ज स्वरूपात व चालू खात्यावर पाचशे व हजार रुपयांच्या नोट्या घेतल्या जात होत्या; मात्र सहकार खात्याचे आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी फतवा काढल्याने या पतसंस्थांनीही आज दिवसभरात एक रुपयाही स्वीकारला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अजून अडचण निर्माण झाली. चांदवड शहरातील स्टेट बॅँक आॅफ इंडिया, बॅँक आॅफ महाराष्ट्र, चांदवड मर्चण्ट बॅँक, जिल्हा मध्यवर्ती बॅँक या शाखा उघडण्याआधीच ग्राहक व महिला सकाळी ९ ते १० वाजेपासून पायरीवर येऊन बसतात, असा अनुभव दोन दिवसांपासून येत आहे. प्रत्येकाने आपल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बॅँकेतील खात्यावर जमा करून केवायसी म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड द्यावयाचे आहे. त्यामुळे ग्राहक सैरावैरा पळताना दिसत होते. (लोकमत ब्यूरो)