शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

रणरणत्या उन्हात टँकरपुढे रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:27 AM

गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे या केंद्रावरून पुरवठा केल्या जाणाऱ्या भागांमध्ये बुधवारी (दि. ४) अचानकपणे पाणीबंदीचे संकट ओढवले आहे. दुपारी बारा वाजेपासून या भागात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ लागल्याने रणरणत्या उन्हात हंडे घेऊन महिलांना टॅँकरपुढे रांगा लावाव्या लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे या केंद्रावरून पुरवठा केल्या जाणाऱ्या भागांमध्ये बुधवारी (दि. ४) अचानकपणे पाणीबंदीचे संकट ओढवले आहे. दुपारी बारा वाजेपासून या भागात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ लागल्याने रणरणत्या उन्हात हंडे घेऊन महिलांना टॅँकरपुढे रांगा लावाव्या लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले.  गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीला मागील काही दिवसांपासून गळती लागली असेल मात्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांच्या सदर बाब उशिरा लक्षात आली असावी, असे संतप्त महिलांनी सांगितले. जलवाहिनी दुरुस्ती मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यंत पूर्ण होऊ न शकल्यामुळे बुधवार ‘कोरडा दिवस’ ठरला. गुरुवारीही कमी दाबाने पाणी येणार असल्यामुळे नागरिकांचे हाल होणार आहे. भर उन्हाळ्यात वडाळागाव परिसरात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. सकाळी वडाळागावातील दैनंदिन पाणीपुरवठा संपूर्णपणे खंडित झाल्याने नळ कोरडेठाक पडले होते. सकाळी सात ते अकरा वाजेच्या वेळेत वडाळागावसारख्या गावठाण व दाट लोकवस्तीच्या परिसरात पिण्याच्या पाण्याचे टॅँकर पुरविण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाकडून परिसरनिहाय होणे अपेक्षित होते; मात्र दुपारी नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यानंतरटॅँकर गावात सुरू झाले. परिणामी कमाल तपमानाचा पारा चाळिशीच्या जवळ पोहचलेला असताना रणरणत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ‘चटके’ सहन करण्याची वेळ महिलांवर ओढवली. त्यामुळे वडाळागाव परिसरातील महिलांनी महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुपारी बारा वाजेनंतर वडाळागावात दोन टॅँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यास सुरुवात करण्यात आली होती.या भागांना फटकाप्रभाग १६ मधील उपनगर (शांतीपार्क) ते रामदास स्वामीनगरचा परिसर, प्रभाग १८ मधील नारायणबापूनगर ते दसक गाव, प्रभाग १८ मधील शिवाजीनगर ते शिवशक्तीनगर परिसर, प्रभाग १९ मधील गोरेवाडी ते सामनगाव, प्रभाग २० मधील जयभवानीरोड ते बिटको कॉलेज परिसर व आर्टिलरी सेंटर रोड, प्रभाग २२ मधील विहितगाव ते वडनेररोड व प्रभाग २३ मधील दीपालीनगर ते साईनाथनगर, वडाळारोड परिसरासह गावठाण भागात पाणी पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.पाण्याचे दुर्भिक्ष; उन्हाच्या झळा अन् महिलांची वणवणवडाळागावात दाट लोकवस्ती असून, लहान घरे असल्यामुळे रहिवाशांना पाणीसाठा करणे जिकिरीचे होते. जलवाहिनी दुरुस्तीचे अचानकपणे काम वाढल्याने बुधवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पाणीपुरवठा विभागाने सकाळच्या सुमारास टॅँकर वडाळागावात पाठविणे गरजेचे होते; मात्र दुपारी संबंधित लोकप्रतिनिधींकडे नागरिकांनी ओरड केल्यानंतर टॅँकर गावात पोहचले. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागला.

टॅग्स :Waterपाणी