नाशिक : नाटक संगीत कला यांनी मानवी जीवनात समृद्धी आणली आहे. कोरोनाच्या भीतीदायक काळात मानसिक ताण तणावातून बाहेर पडण्यासाठी रसिकांनी नाट्यगृहाकडे वळावे त्यासाठी सार्वजनिक वाचनालय नाट्ययज्ञासारखे उपक्रम पुन्हा सुरु करणार आहेत. नाशकातील नाट्य कर्मीनी आणि नाट्य संस्थांनी नाटका पडदा उघडला आहे. हे लक्षात घेऊन. आपल्या कलाकृती सादर कराव्यात असे आवाहन जयप्रकाश जातेगावकर यांनी मराठी रंगभूमी दिनानिमित्त आयोजित रंगमंच पूजनाचे कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले. रंगमंच पूजन नाट्यगृहाचे माजी सेवक व रंगभूमीसाठी महत्वाची सेवा करणारे पडद्यामागील कलावंत श्री. व सौ. कांता हिंगणे यांच्या हस्ते सार्वजनिक वाचनालयाच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात करण्यात आले यावेळी कांता हिंगणे यांनी परशुराम सायीखेडकर नाट्यगुहाच्या वाटचालीतील अनेक आठवणींना उजळा दिला. या कार्यक्रमप्रसंगी नाट्य परिषदेने पुरस्कार जाहीर केलेल्या रंगकर्मीचा गौरव वाचनालयाचे कार्याध्यक्ष वसंत खैरनार, सहा. नाट्यगृह संजय करंजकर व वाचनालयाचे माजी सचिव श्रीकांत बेणी यांच्या हस्ते करण्यात आला.या समारंभास नाशिकमधील रंगकर्मी रविंद्र कदम, सदानंद जोशी, श्री. व सौ.अनिरुद्ध जोशी, नवीन तांबट, विनोद राठोड, सचिन शिंदे, फणींद्र मंडलिक, माणिक कानडे, केशव कासार, मंगेश मालपाठक, राजेंद्र जाधव, ईश्वर जगताप, सुषमा देशपांडे, केतकी कुलकर्णी, चारुदत्त दीक्षित तसेच नाट्यसंस्थाचे प्रतिनिधी व रसिक उपस्थित होते. आभार प्रदर्शन ग्रंथसचिव देवदत्त जोशी यांनी केले.