लोकमत न्यूज नेटवर्कओझर : दप्तरमुक्त शनिवार असल्याने सध्या सुरू असलेल्या स्वच्छता अभियान पंधरवडा या उपक्रमांतर्गत पहिल्या दिवशी स्वच्छतेवर आधारित रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडली.बाणगंगानगर शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित विविध रांगोळ्या काढल्या. विद्यार्थ्यांची गटनिहाय स्पर्धा घेण्यातआली. त्यात स्वच्छतेची साधने, ओला व सुका कचरा, स्वच्छ भारत-सुंदर भारत, झाडू मारताना व कचरा कचरापेटीतटाकताना विद्यार्थी अशा विविध विषयांवर रांगोळ्या काढण्यात आल्या. प्रदर्शन बघण्यासाठी पालक, गावकरी आणि महिलांनी गर्दी केली.शिक्षक नलिनी अहिरे यांनी विद्यार्थ्यांना समुपदेशन केले. मुख्याध्यापक संजय पवार यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास पवार, पोलीसपाटील सुनील कदम, बाजीराव वाघ, भूषण शिलेदार, बाजीराव सताळे, संतोष लिलके उपस्थित होते.
बाणगंगानगरला रांगोळी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:57 AM
ओझर : दप्तरमुक्त शनिवार असल्याने सध्या सुरू असलेल्या स्वच्छता अभियान पंधरवडा या उपक्रमांतर्गत पहिल्या दिवशी स्वच्छतेवर आधारित रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडली.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांची गटनिहाय स्पर्धा घेण्यात आली. दप्तरमुक्त शनिवार : स्वच्छता अभियानावर रांगोळ्या