एकलहरे : येथील कामगार मनोरंजन केंद्रात गणेश उत्सवानिमित्त विविध सामाजिक संदेश देणारे रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले होते.रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता उमाकांत निखारे, एन.एम. शिंदे, उपमुख्य अभियंता देवेंद्र माशाळकर, अधीक्षक अभियंता मनोहर तायडे, शशांक चव्हाण, कल्याण अधिकारी निवृत्ती कोंडावले, लीना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.एकलहरे वसाहतीतील चेमरी नंबर दोन व नवीन मार्केट यार्ड येथील अंगणवाडी सेविकांनी स्वच्छता सर्वेक्षण २०१८, बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला व बालविकास, झाडे लावा झाडे जगवा, आरोग्यसंवर्धन, पोषण आहार अभियान आदी विविध विषयांवर आकर्षक व कलात्मक रांगोळ्या काढल्या होत्या. रांगोळ्या काढणाऱ्या अंगणवाडी सेविका ज्योत्स्ना माळी, मोनाली थोरात, सोनाली चिंचोरे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गणेशोत्सवानिमित्त रांगोळी प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:20 AM