नाशिक : ४५ लाख रुपये बाजारमूल्य असलेला गाळा दहा लाख रुपयांना विक्री करावा यासाठी गाळामालकास धमकावून रस्ता बंद केल्याप्रकरणी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख संशयित सुहास कांदे यांच्यासह आणखी एकाविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़गौरव प्रदीप मेहरा (४२,रा़२८ एल़आय़सीक़ॉलनी, टाकळीरोड, द्वारका) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार कॅनडा कॉर्नरवरील सिल्व्हर प्लाझामध्ये त्यांचा १२ नंबरचा गाळा आहे़ या गाळ्याची विक्री तसेच भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रयत्नात असलेल्या मेहरा यांना १ फेब्रुवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत संशयित कांदे व त्यांचा साथीदार मनोज यांनी मज्जाव केला़ तसेच ४५ लाख रुपये किमतीचा गाळा दहा लाख रुपये किमतीत मागितला असता मेहरा यांनी नकार देताच या गाळ्याकडे जाणारा रस्ता अडविल्याचे फिर्यादित म्हटले आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुहास कांदें विरोधात खंडणीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 12:36 AM
४५ लाख रुपये बाजारमूल्य असलेला गाळा दहा लाख रुपयांना विक्री करावा यासाठी गाळामालकास धमकावून रस्ता बंद केल्याप्रकरणी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख संशयित सुहास कांदे यांच्यासह आणखी एकाविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
ठळक मुद्देसरकारवाडा : गाळामालकाकडून खंडणी मागितल्याची तक्रार