रावसाहेब दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडले ; अशोक चव्हाण यांची बोचरी टिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 06:20 PM2018-09-15T18:20:53+5:302018-09-15T18:23:24+5:30
रावसाहेब दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना राफेल आणि रायफल याच्यातील फरक समजत नाही. राफेलचा विषय दानवेच्या आकलनापलिकडचा असल्याचे सांगत या विषयावर पंतप्रधानांनीच बोलायला हवे अशी मागणी करतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाजपा प्रदेशाध्याक्ष रावसाहेब दाणवे यांच्यसह भाजपावरही बोचरी टिका केली.
नाशिक : रावसाहेब दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना राफेल आणि रायफल याच्यातील फरक समजत नाही. राफेलचा विषय दानवेच्या आकलनापलिकडचा असल्याचे सांगत या विषयावर पंतप्रधानांनीच बोलायला हवे अशी मागणी करतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाजपा प्रदेशाध्याक्ष रावसाहेब दाणवे यांच्यसह भाजपावरही सडेतोड टिका केली.
उत्तर महाराष्ट्रातील जनसंघर्ष यात्रेच्या नियोजन बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पेट्रोल दरवाढीवरून सरकारला धारेवर धरले. तसेच रविशंकर प्रसाद यांच्या पेट्रोल डिङोलचे जर सरकाच्या हातात नसल्याच्या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेचला त्यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याचे चव्हाण म्हणाले. सरकारने अतिरिक्त कर लादल्यानेच इंधनाचे दर वाढले आहेत. पेट्रोल आणि डिङोलवरील कराच्या माध्यमातून भाजप सरकार सर्वसामन्या जनतेच्या खिशातील पैसा काढून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर बोलताना त्यांनी मनसे आणि एमआयएम सोडून अन्य समविचारी पक्षांची आघाडीसाठी बोलणो करण्याची काँग्रेसची तयारी आहे. भारीप बहूजन मगासंघाशी बोलणी करणार असल्याचेही स्पष्ट करतानाच आघाडीत सहभागी होण्याविषयी भारिपने फेरविचार करायला हवा असे आवाहनही अशोक चव्हाण यांनी केले आहे.तसेच बसपा आणि काँग्रेसची आघाडी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, शोभा बच्छाव, जिल्हाध्य राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर आदि पदाधिकारी व कायर्कर्ते उपस्थित होते. दरम्यान, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी नाशिकमध्ये आलेले असताना रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर टिका करताना काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा ज्या ठिकाणाहून गेली तेथे भाजपचाच विजय झाल्याचे म्हटले होते.