शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
Google Pay, PhonePe आणि Paytm युझर्स लक्ष द्या, १ नोव्हेंबरपासून UPI पेमेंटमध्ये होणार २ बदल
6
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
7
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
8
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
9
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
10
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
11
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
12
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
13
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
14
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
15
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
16
शिंदे - अजित पवारांना संपविण्याची भाजपची खेळी, मविआमध्ये वाद नाहीत - रमेश चेन्नीथला 
17
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
18
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
19
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
20
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल

अल्पवयीन मुलीवर आईच्या प्रियकराकडून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 1:40 AM

एक घटस्फोटित महिला दुसऱ्या लग्नानंतर पतीपासून विभक्त झाली. तिच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रियकराने पहिल्या पतीपासून झालेल्या तिच्या अल्पवयीन मुलीवर सलग चार महिने शारीरिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी बजरंग वाडीतून मूळचा परभणी येथील रहिवासी असलेल्या संशयित शिवाजी साळवे (३०) याला अटक केली.

ठळक मुद्देधक्कादायक : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत केले कृत्य

नाशिक : एक घटस्फोटित महिला दुसऱ्या लग्नानंतर पतीपासून विभक्त झाली. तिच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रियकराने पहिल्या पतीपासून झालेल्या तिच्या अल्पवयीन मुलीवर सलग चार महिने शारीरिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी बजरंग वाडीतून मूळचा परभणी येथील रहिवासी असलेल्या संशयित शिवाजी साळवे (३०) याला अटक केली.

पोलीससूत्रानुसार, २८ वर्षीय विवाहित महिला मूळ परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील रहिवासी आहे. तिला पहिल्या पतीपासून ११ वर्षांची मुलगी असून, पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर महिलेने दुसऱ्या पुरुषासोबत विवाह केला. त्याच्यापासून तिला दोन मुले झाली. दरम्यान, दोघांमध्ये कौटुंबिक कलह वाढू लागल्याने तिने विभक्त राहत घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. दीड वर्षांपासून महिला विभक्त राहत आहे. घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ती तिसऱ्या पुरुषासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये नाशिक येथे राहू लागली. आपल्या मुलांच्या उदरनिर्वाहसाठी तिने धुणीभांडीची कामे सुरू केली. जेव्हा महिला कामावर जात असे, तेव्हा तिचा प्रियकर तिच्या ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी साळवे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

--इन्फो--

मुलांसोबतही अनैसर्गिक कृत्य

फिर्यादी महिलेच्या लहान मुलांसोबतदेखील साळवे हा अनैसर्गिक अत्याचार करत त्यांचे मोबाईलद्वारे व्हिडिओ तयार करत होता, असेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार व पोस्को कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हे करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग