शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची तयारी वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:23 AM

नाशिक तालुका पूर्व भागातील गावांमध्ये सध्या रब्बी हंगामाच्या शेतीकामांची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी आडसाली सुरू उसाच्या तोडणीला सुरुवात झाली आहे.

एकलहरे : नाशिक तालुका पूर्व भागातील गावांमध्ये सध्या रब्बी हंगामाच्या शेतीकामांची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी आडसाली सुरू उसाच्या तोडणीला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी गहू, हरभरा या पिकांची पेरणी पूर्ण होऊन त्याची मशागत व उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.  नाशिक तालुका पूर्व भाग व एकलहरे पंचक्रोशीतील सामनगाव, कोटमगाव, चाडेगाव, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरे गाव, गंगावाडी या भागातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीत व्यस्त आहेत. सध्या सर्वत्र जोरदार थंडी पडली असूून, या थंडीचा फायदा रब्बी पिकांना होतो. कडाक्याच्या थंडीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, कांदे ही पिके जोमाने वाढतात व त्यांना पाणीही कमी लागते. त्यामुळे या रब्बी पिकांसाठी थंडी वरदान ठरते. मात्र द्राक्षबागांसाठी हीच थंडी मारक ठरते. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षमण्यांच्या वाढीवर परिणाम होतो. तर ज्या मण्यांची वाढ यापूर्वीच झाली आहे त्यांना थंडीमुळे तडे जातात. म्हणून द्राक्षबागांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी चहुबाजूने ग्रीन नेट व वरून जाळीदार नेटचे आवरण लावले जात आहे.गहू,  हरभरा लागवड जोमातरब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गहू, हरभºयाची लागवड तालुक्याच्या पूर्व भागात केली जाते. येथील जमीन काळी कसदार व बारमाही पाण्याखाली असल्याने गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काही ठिकाणी नोव्हेंबरच्या मध्यात गव्हाची पेरणी झाली आहे. तर काही ठिकाणी अजूनही शेतकरी गव्हाची पेरणी करीत आहेत. क्वचित ठिकाणी टोचन पद्धतीने हरभºयाची लागवड केलेली आहे.नाशिकचा ऊस नगरकडेनाशिक तालुक्यातील पूर्व भागात गोदावरी व दारणा नद्यांच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात ऊसलागवड करण्यात आली असून, आडसाली व सुरू ऊस तोडण्यासाठी ऊसतोड कामगारांचे जत्थे ठिकठिकाणी शेतांमध्ये कुडाच्या व उसाच्या पाचटाच्या झोपड्या करून मुक्कामाला थांबले आहेत. दिवसभर ऊसतोड करून, तो ट्रकमध्ये भरण्याचे काम मजुरांमार्फत केले जाते. नाशिक परिसरातील साखर कारखाने बंद असल्याने सध्या आपला ऊस नगर जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये पाठविला जात आहे. कारखान्यांचे गळीत सुरू होऊन परिसरात बºयापैकी ऊसतोड झाल्याने शेतात उरलेले पाचट तेथेच जाळण्यावर शेतकरी भर देत असून, पाचट जाळल्याने त्याची राख खोडव्याला खत म्हणून वापर केला जातो. पाणी भरल्यावर खोडवा पुन्हा जोमाने फुटतो, अशी शेतकºयांची धारणा आहे.उन्हाळ कांद्याची तयारीएकलहरे परिसरात उन्हाळ कांद्याच्या लागवडीची तयारी केली जात असून, त्यासाठी शेतकरी स्वत: रोपे तयार करीत आहे तर काही रोपे विकत आणून कांद्याची लागवड करतात. कांदा लागवडीसाठी मजुरांची वानवा असल्याने ठेकेदारी पद्धतीने मजूर उपलब्ध करून कांदा लागवड केली जाते.  यंदा कांदा लागवडीसाठी मजुरांची वानवा जाणवण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिकagricultureशेती