------------------------------------------------------------------------------
चांदवड शहरात २५ जणांची रॅपिड चाचणी
चांदवड : शहरात तसेच चांदवड मनमाड रोडवर व गणूर चौफुली व बसस्थानक परिसरात बेशिस्त वागणाऱ्या २५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांची चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेऊन रॅपिड अँटिजन चाचणी केली. परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवून पंचवीस नागरिकांवर दोनशे रुपयाप्रमाणे पाच हजार रुपये दंड वसूल केला. यावेळी चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक गजानन राठोड, सहायक पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, अशोक पवार, जे. टी. मोरे, आर. पी. गायकवाड, दीपक मोरे, हरिचंद्र पालवी, एम. यु. देशमुख, योगेश हेबांडे, उत्तम गोसावी, गेणू निंबेकर, विक्रम बस्ते. रवींद्र पेंढारी व होमगार्ड आदी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------
चांदवडला एका दिवसात २४ नवीन कोरोना रुग्ण
चांदवड : येथे दि. १७ मे रोजी ७० व्यक्तींपैकी २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णामध्ये सर्वाधिक रुग्ण चांदवड शहरातील विविध भागात सर्वाधिक रुग्ण आहेत. तालुक्यातील धोंडबा, दुगाव, गणूर, परसूल, कोकणखेडे, पिंपळद, राहुड, शेलु, सुतारखेडे, तांगडी, उधरूळ, उसवाड, वडाळीभोई, वडनेरभैरव, विटावे एकूण २४ जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.
------------------------------------------------------
चांदवडला पावसामुळे खड्यात पाणीच पाणी
चांदवड : शहरात दोन दिवसांपासून किरकोळ स्वरुपाचा पाऊस झाल्याने शहरात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाईपलाईनसाठी नाल्या खोदल्याने या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. नगरपरिषदेने रस्त्यावरील मोठे खड्डे मुरुमाच्या साह्याने बुजवावे, अशी मागणी आहे.
------------------------------------------------------
चांदवडला विजेचा लंपडाव सुरूच
चांदवड : शहरात दोन दिवसांपासून वादळी वारा झाला. त्यामुळे शहरातील सर्वच परिसरात विजेचा सारखा लपंडाव सुरू आहे. विजेचा पुरवठा पूर्वसूचना न देता बंद केला जातो असा प्रकार असून, एखादे वेळी पूर्वसूचना दिली तर वीज कधीही बंद होते व कधीही येते असा सारखा विजेचा लपंडाव सुरू आहे.