शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

रासेगावला किरकोळ वादातून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 1:20 AM

तालुक्यातील रासेगाव येथे गाडीने कट मारला या किरकोळ वादातून दोन गटांत हाणामारी होत एका युवकाचा निर्घृण खून झाला असून, पोलिसांनी तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एका संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून, तीन जण फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

दिंडोरी : तालुक्यातील रासेगाव येथे गाडीने कट मारला या किरकोळ वादातून दोन गटांत हाणामारी होत एका युवकाचा निर्घृण खून झाला असून, पोलिसांनी तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एका संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून, तीन जण फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. रासेगाव येथील उत्तम गुलाब लहांगे (२२) व सुनील संजय लहांगे (२२) हे गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास रासेगाव येथे इंदोरे रोडने फिरायला जात असताना संजय सुकदेव बेंडकुळे याने चारचाकी गाडीने येत कट मारला. या कारणावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. यानंतर पुन्हा रात्री आठ वाजता पाण्याच्या टाकीजवळ वाद होत संजय सुकदेव बेंडकुळे, संदीप संजय बेंडकुळे, भावराव पुंडलिक बेंडकुळे, तानाजी हिरामण बोके (सर्व रा. रासेगाव) यांनी वाद घालत संजय बेंडकुळे व तानाजी बोके यांनी सुनील संजय लहांगे याचे हात पकडून ठेवत भावराव बेंडकुळे याने सुनीलवर तलवारीने पोटावर वार केला. मात्र तो चुकवला. यानंतर संजय बेंडकुळे याने तलवारीने त्याच्या पोटावर वार केला. त्यात सुनील लहांगे गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना रात्री १२.३० वाजता त्याचा मृत्यू झाला.दिंडोरी पोलिसांनी उत्तम गुलाब लहांगे याच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, भावराव पुंडलिक बेंडकुळे यास अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील, प्रभारी अधिकारी एम. सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी अधिक तपास करीत आहेत.मृतदेह आरोपीच्या घरासमोरखुनी हल्ला झालेल्या सुनील लहांगे या युवकाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी रात्री पोलिसांनी फिर्याद नोंदून न घेतल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. संशयित आरोपी संजय सुकदेव बेंडकुळे याच्या घरावर हल्ला करत तेथेच खड्डा खोदत मृत युवकाचे दफन करण्याची भूमिका घेत घरासमोर तब्बल चार तास ठिय्या दिला. सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी एम. सुदर्शन यांनी नातेवाइकांची समजूत काढत आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेत सुनील लहांगे याच्यावर रासेगाव येथील स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यविधी केला. पोलिसांनी रासेगाव येथे पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. रासेगाव येथे गुरु वारी सायंकाळी दोन गटांत वाद होऊन त्यात एका युवकावर खुनी हल्ला करण्यात आला. यात जखमी युवकाला उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात नेण्यात आले. यानंतर दोन्ही गट दिंडोरी पोलीस ठाण्यात आले. त्यातील ज्या गटाने हल्ला केला त्यातील एकाने उमराळे बु. पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना किरकोळ वाद असल्याचे सांगितले, तर दुसऱ्या गटाने आमचा नातेवाईक युवक सुनील लहांगे याच्यावर खुनी हल्ला झाला असून, तो गंभीर जखमी असल्याचे सांगत फिर्याद देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी तसा काही प्रकार नाही, किरकोळ घटना आहे असे सांगत जखमीची तब्बेत व्यवस्थित आहे असे सांगुन आपसात मिटवून घेण्याचा अनाहूत सल्ला दिला.मध्यरात्रीपर्यंत २० ते २५ महिला, पुरुष नातेवाईक पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्याकडे आरोपींविरूद्ध फिर्याद दाखल करून घेत तत्काळ कारवाई करण्यासाठी गयावया करत होते. मात्र जखमी सुनीलची तब्बेत ठीक आहे असे सांगत जिल्हा रु ग्णालयातून वैद्यकीय अहवाल आल्यावर कारवाई करू, असे शिंदे यांनी सांगून नातेवाइकांना घरी जायला सांगितले. प्रसारमाध्यम प्रतिनिधींनाही वृतांकन करण्यापासून रोखले. वरिष्ठ अधिकाºयांनाही याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. अखेर रात्री साडेबाराच्या सुमारास जखमी युवकाचा मृत्यू झाल्याची खबर मिळताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. तातडीने रासेगाव येथे पोलीस पथकाने धाव घेत संशयित आरोपींच्या घरी धाड टाकली व एक संशयिताला ताब्यात घेतले. मात्र मुख्य आरोपीसह दोन जण फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Murderखून