शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

‘सूरविश्वास’ मैफलीत रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:39 AM

सूर-तालची मधुर बरसात घेऊन रम्य सकाळ ख्याल गायकी, बंदीश, गजल, अशा विविध रूपांनी बरसत होती व रसिकांना अवीट, अभिजात आनंद देत होती. स्वरांतून निथळणारा आशय, शब्दसाज लेऊन स्वराभिषेकच करत होता.

नाशिक : सूर-तालची मधुर बरसात घेऊन रम्य सकाळ ख्याल गायकी, बंदीश, गजल, अशा विविध रूपांनी बरसत होती व रसिकांना अवीट, अभिजात आनंद देत होती. स्वरांतून निथळणारा आशय, शब्दसाज लेऊन स्वराभिषेकच करत होता. ‘सूर विश्वास’ उपक्र माचे तृतीय पुष्प आनंद अत्रे यांनी गुंफले.आनंद अत्रे यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने मैफलीत उत्साह निर्माण केला. मैफलीची सुरुवात अहिर भैरव रागातील बडा ख्यालाने केली. शब्द होते ‘हो करतार’. मैफलीला साथसंगत हर्षद वडजे (हार्मोनियम), रोहित नागरे (तबला) यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. ध्वनी व्यवस्था पराग जोशी यांची होती. विश्वास ग्रुपतर्फे ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे आयोजन क्लब हाउस येथे करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विश्वास ज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्र म संपन्न झाला. विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्र माचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे. कार्यक्र मास अनिल लाड, डॉ. मनोज शिंपी, अमर भागवत, डॉ. हरी कुलकर्णी, अमित शहा, संजय परांजपे, सतीश गायधनी, मिलिंद धटिंगण, शरद पटवा, विनय अंधारे, प्रसाद देशपांडे, प्रिया तुळजापूरकर, बाळ नगरकर, राजा पाटेकर, रवींद्र कट्यारे, चंद्रशेखर ओढेकर, संजीव गावणेकर, सोमनाथ गायकवाड, नेहा देशपांडे, उर्मिला झनकर आदी मान्यवर उपस्थित होते.छोटा ख्यालात ‘अलबेला साजन आयो री’ या शास्त्रीय गायनानंतर नाट्यगीताने रंग भरला, शब्द होते ‘या भवनातील गीत पुराने’ नाट्यसंगीत पर्वातील एका युगाचीच त्यांनी आठवण करून दिली. ‘रंजीश ही सही, दिल ही दुखाने के लिए आ’, त्यानंतर ‘काश ऐसा कोई मंजर होता मेरे काँधे पे तेरा सर होता’ अशा गजलांतून भाषेची नजाकत आणि गायकीची प्रचिती दिली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक