सिन्नर : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने ते वाचविण्यासाठी समता परिषदेच्या पुढाकारातून जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय ओबीसी समाजबांधव सहभागी झाले होते. सिन्नरला तहसीलदार राहुल कोताडे यांना ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले आहे. या संदर्भामध्ये समाजाची नेमकी संख्या किती आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारकडे विचारणा केली होती. परंतु ओबीसी जनगणनेचा डाटा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केलेला नाही. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण रद्द केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजी व आक्रोश असल्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे.
केंद्र सरकारने तातडीने ओबीसी जनगणना करावी व सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून ओबीसी समाजाचे आरक्षण कायम करावे या मागणीसाठी सिन्नर बसस्थानकासमोर नाशिक-पुणे महामार्गावर सर्वपक्षीय ओबीसी बांधवांनी एकत्र येत रास्ता रोको केले. यावेळी तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात समता परिषदेचे तालुका अध्यक्ष संजय काकड, राजेंद्र जगझाप, बाळासाहेब वाघ, उदय सांगळे, बंडूनाना भाबड, डॉ. विष्णू अत्रे, राजेंद्र भगत, कैलास झगडे, राम लोणारे, राहुल जाधव, डॉ. संदीप लोंढे, डॉ. सदाशिव लोणारे, मनोज महात्मे, संदीप लोंढे, पवन पाटील, सुनील दातरंगे, बाबूराव सुरडकर, राजाभाऊ लोणारे, धर्मा मुरडनर, लक्ष्मण बर्गे, शैलेश नाईक, चंद्रकांत माळी, मेघा दराडे, संध्या भगत, आफ्रीन सय्यद, विकास महात्मे, अतुल पाचोरे, निवृत्ती पवार, भाऊसाहेब पवार, तानाजी सानप, मदन गोळेसर, योगेश माळी, रामभाऊ बुचडे, संदीप गोरे, डॉ. जी. एल. पवार, प्रदीप लोणारे, अशोक भाबड, रवींद्र काकड, सरला गायकवाड, राजेंद्र माळी यांच्यासह सर्वपक्षीय ओबीसी बांधव उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी, पोलीस कर्मचारी अंकुश दराडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.
--------------
फोटो ओळी- सिन्नर येथे ओबीसी आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलनात सहभागी झालेले समता परिषद व सर्वपक्षीय ओबीसी कार्यकर्ते. (१७ सिन्नर ओबीसी)
===Photopath===
170621\17nsk_17_17062021_13.jpg
===Caption===
१७ सिन्नर ओबीसी