नांदगाव : मार्च,एप्रिल महिन्यात विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान मिळावे, तालुक्यात नाफेडचे केंद्र सुरू करावे, कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे आदी मागण्यासाठी येथील बाजार समितीच्या येवला रस्त्यावरील प्रवेशद्वारापुढे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.६) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.कांद्याचे कोसळणारे बाजारभाव बघता तालुक्यात कांद्याची पारदर्शक विक्री व्हावी यासाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने नीलेश चव्हाण, विशाल वडघुले, सोमनाथ मगर, गणेश जाधव, बिरू शिंदे, शिवाजी जाधव, अरुण पवार, योगेश वाघ, पपू काकलीज, राहुल काकलीज, आबा सरोदे, सुरेश घोटेकर, योगेश चव्हाण, संदीप चव्हाण, तेजस बोरसे, राजू बोरसे, मनोहर पवार, शांताराम शिंदे, समाधान व्हडगर, नारायण सदगीर, भरत मोरे, चंद्रकांत मोरे, युवराज चव्हाण, गंभीर मोरे, अप्पा बेंडके आदींनी रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला.निवासी नायब तहसीलदार आर. एम. मरकड यांनी आंदोलक शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले,या आंदोलनात मोठ्या संख्यने शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती.
बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2022 12:42 AM
नांदगाव : मार्च,एप्रिल महिन्यात विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान मिळावे, तालुक्यात नाफेडचे केंद्र सुरू करावे, कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे आदी मागण्यासाठी येथील बाजार समितीच्या येवला रस्त्यावरील प्रवेशद्वारापुढे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.६) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देनांदगाव : कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केल्या विविध मागण्या