ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील बसस्थानक चौफुलीवर मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘एक मराठा,लाख मराठा’, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ या घोषणांनी चौफुली परिसर दुमदुमला होता. रास्ता रोकोआंदोलनामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प होती. ताहाराबाद गांवातील व्यापारी वर्गाने दिवसभर आपली दुकाने बंद ठेवत पाठिंबा दर्शविला. यावेळी झालेल्या सभेत नामपूर बाजार समितीचे संचालक कृष्णा भामरे, शांताराम निकम, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ प्रशांत सोनवणे, धुळे लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन कोठावदे, डॉ. प्रसाद सोनवणे,अॅड. किरण देवरे,डॉ. नितिन पवार, प्रमोद भामरे, संजय देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. पंकज भामरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश गुरव यांना निवेदन देऊन आरक्षणाची मागणी करण्यात आली. याप्रसंगी ताहाराबाद व परिसरातील शेकडो मराठा समाज बांधव,ग्रामस्थ उपस्थित होते.
ताहाराबादला मराठा आरक्षणासाठी रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 4:35 PM
रास्ता रोकोआंदोलनामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प
ठळक मुद्देताहाराबाद गांवातील व्यापारी वर्गाने दिवसभर आपली दुकाने बंद ठेवत पाठिंबा दर्शविला.सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश गुरव यांना निवेदन देऊन आरक्षणाची मागणी