शहरं
Join us  
Trending Stories
1
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
3
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
4
आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील
5
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
6
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
7
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
8
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
9
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
10
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
11
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
12
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
13
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
14
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
15
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
16
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
17
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
18
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
19
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
20
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."

मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी रतनकुमार इचम

By admin | Published: November 17, 2016 11:02 PM

मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी रतनकुमार इचम

 घोटी : नाशिक जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा सरचिटणीस रतनकुमार इचम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी इचम यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुलढिकले, सरचिटणीस मनोज चव्हाण आदि उपस्थित होते.मनसेच्या नाशिक जिल्हा ग्रामीणच्या कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वपूर्ण समजली जाते.दरम्यान, या नियुक्तीनंतर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम यांनी स्पष्ट केले की, मनसेच्या स्थापनेपासून पक्षनिष्ठा ठेवून आपण पक्षवाढीकरिता सक्रिय आहोत. या माध्यमातून अनेक आंदोलने करून अनेक प्रश्न मार्गी लावले. यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्याची कदर करून पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे. या विश्वासाला कदापि तडा जाऊ न देता आगामी काळात पक्षवाढीसाठी आपण प्रयत्न करू. तसेच होऊ घातलेल्या नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत सत्ता आणण्यासाठी आपण नियोजन करू, असे ते म्हणाले. (वार्ताहर)