नाशिक : जिल्हा परिषदेची विविध विकासकामे घेताना मक्तेदारमंजूर अंदाजपत्रकाच्या चक्क २५ टक्के कमी दराने कामे घेत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे विकासकामांची गुणवत्ता मोेठ्या प्रमाणात ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी १० टक्केपासून पुढील कमी दराच्या विकासकामांची सामनगाव शासकीय तंत्र निकेतन कार्यालयाकडून तांत्रिक तपासणी व गुणवत्ता तपासून घ्यावी, असे पत्र अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना दिले आहे. त्यामुळे २५ टक्के कमी दराने जिल्हा परिषदेची कामे घेणाऱ्या मक्तेदारांचे धाबे दणाणल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे १० टक्के कमी दराच्या पुढे कामे घेणाऱ्या मक्तेदारांची एकूण कामाच्या रकमेच्या १० टक्के रक्कम अनामत जमा ठेवण्यात यावी. मूळ अंदाजपत्रकाच्या २५ टक्के कमी दराने निविदा प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदअंतर्गत होणारी विकासकामे गुणवत्तेनुसार होती किंवा नाही याबाबत ग्रामीण भागातील जनता व जिल्हा परिषद लोकप्रतिनिधींच्या मनात साशंकता आहे.
कामांची ‘दर’वारी २५ टर्क्क्यांपर्यंत घसरली खाली
By admin | Published: January 23, 2015 1:44 AM