फांद्या विद्युततारांवर झुकल्याने धोका
नाशिक : शहरातील काही सोसायट्यांमध्ये रहिवाशांनी लावलेल्या वृक्षांच्या फांद्या रस्त्याच्या बाजूला झुकल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी विद्युततारांवर फांद्या झुकल्याने धोका निर्माण झाला आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी परीसरातील रहिवाशांकडून होत आहे.
दूषित पाण्यामुळे गोदावरीचे प्रदूषण
नाशिक : शहरातील विविध भागातून दूषित पाणी थेट गोदावरी नदीपात्रात मिसळले जात असल्याने गोदावरीच्या प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात असून गोदावरीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीमधील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या परिसरात दिवसभर कामगारांची वर्दळ सुरूअसते. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेक कामगारांच्या वाहनांचे नुकसान होत असल्याने त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. महापालिकेने परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.
रस्त्यावरील वाहनांमुळे अडथळा
नाशिक : नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात रस्त्यावर थांबणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अनेक नागरिक रस्त्यावरच आपली वाहने उभी करत असल्याने या ठिकाणाहून पायी चालणेही कठीण होते. यामुळे नाराजी व्यक्त केली जात असून, याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्याच येत आहे.