पिंपळगाव बसवंत : येथून जवळच असलेल्या बेहेड गावातील महिलांनी रेशन दुकानातून धान्य लंपासकरणारे वाहन पोलीस ठाण्यात जमा केले. बेहेड येथील सप्तशृंगी महिला बचतगटाने गेल्या दहा वर्षांपासून सोसायटीकडून चालवण्यास घेतलेले धान्य दुकान बंद करून पुन्हा सोसायटीकडे वर्ग करावे यासाठी शेकडो आदिवासी महिलांनी सर्वानुमते ठराव मांडला. यानंतर या महिलांनी रेशन दुकानाला कुलूप लावले. याच दिवशी या दुकान चालकाने रात्रीच्या वेळी दुकानातील काही धान्य मारुती व्हॅनमधून लंपास केले.धान्याचा काळाबाजार करण्याच्या हेतूने रात्री ११ वाजता एका अल्टो कारमध्ये धान्य भरत असताना गावातील शेकडो महिलांनी पाहिले व हा सावळागोंधळ समोर आणला. महिलांचा आक्रोश पाहून वाहन चालक पळून गेला. संतप्त महिलांनी वाहनाच्या काचा फोडून आपला राग व्यक्त केला. पिंपळगाव बसवंत पोलिसांना वेळीच पाचारण करण्यात आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. सदर वाहन पिंपळगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. सकाळी पुरवठा अधिकारी ए. एम. शेख. यांनी बेहेड येथील रेशन दुकानातील सर्व दप्तराची तपासणी करून ते ताब्यात घेतले आहे. रेशन दुकानातील आतील बाजूस असलेल्या दरवाजा उघडा असल्याची खात्री करून भर पावसात उभ्या असलेल्या महिलांच्या तक्र ारीची नोंद केली असून, सदर रेशन दुकानाबाबतीत नागरिकांचा विचार करून दुकान बंद करण्याचे आश्वासन शेख यांनी दिले.पिंपळगाव बसवंत येथे संतप्त महिलांनी पोलीस ठाण्यात जमा केलेले वाहऩ
रेशनचा काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 1:01 AM