पिंपळगाव बसवंत : येथील जुन्या मार्केटरोड परिसरात असलेल्या स्वस्त धान्य दुकानाबाबत नागरिकांना रेशन वेळेवर न मिळणे, कमी प्रमाणात मिळने, रेशन घेतल्याची पावती न मिळणे, रेशन घेताना आक्षेपार्ह भाषा वापरणे आदी तक्र ारीवरून नागरिकांना रेशन दुकानातून न मिळणाऱ्या रेशन पुरवठ्याची आॅनलाईन माहिती घेतली असता यात नागरिकांना धान्य वितरित केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.मात्र प्रत्यक्षात नागरिकांना रेशन न मिळाल्याने वाटप झालेले रेशन गेले कुठे असा प्रश्न नागरिकांनी दुकानदार पी. जी. राठी यांना विचारत सकाळ पासूनच रेशन दुकानासमोर ठिय्या मांडत मोठ्या संख्येने गर्दी केली होती. नागरिकांनी या रेशन दुकानाची सविस्तर चौकशी व्हावी यासाठी निफाडचे पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रकाश महाजन यांना प्रकरणाची माहिती दिली.महाजन यांनी दुकानास भेट देत दुकानात असलेल्या मालाची तपासणी केली असता एप्रिल १९ पासून रजिस्टरवर धान्याची नोंद नाही. दुकानाला बोर्ड नाही, दुकानात गहू तांदळाचा साठा नाही, तपासणी अंती दुकानात रिकाम्या पोत्यांखाली धान्याची भरलेली पोती लपविण्यात आली होती.दुकानात दोन ते तीन पोत्यांची तपासणी केली असता त्या पोत्यात १ किलोच्या रिकाम्या डाळीच्या ५०० ते ६०० पिशव्या आढल्याची नोंद पुरवठा निरीक्षकांकडून करण्यात आली आहे. मात्र दुकानातील तीन ते चार पोत्यातील डाळ गेली कुठे? की किराणा दुकानात कमी भावात विकली? असा आरोप नागरिकांकडून करण्यात येऊन संताप व्यक्त करण्यात येत आहे.त्यानंतर दुकानातील डाळीच्या रिकाम्या पिशव्या थेट दुकानाबाहेर ओतत दुकानाला सील लाऊन, दुकान मालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर पुरवठा निरीक्षक अधिकारी प्रकाश महाजन यांनी सविस्तर माहिती नागरिकांच्या समस्यांचा पाढा व आढळलेल्या रिकाम्या डाळीच्या पिशव्यांची नोंद करून तपासणीसाठी खेण्यात आल्या आहेत. पिंपळगाव बसवंत शहरातील ठराविक रेशनदुकान वगळता काही रेशनदुकानदारांची मनमानीमुळे रेशन दुकान उघडत असुन आता याच्यावरहि कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे.(फोटो २७ पिंपळगाव, २७ पिंपळगाव १)
रेशन धान्य वितरीत केल्याचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 9:09 PM
पिंपळगाव बसवंत : येथील जुन्या मार्केटरोड परिसरात असलेल्या स्वस्त धान्य दुकानाबाबत नागरिकांना रेशन वेळेवर न मिळणे, कमी प्रमाणात मिळने, रेशन घेतल्याची पावती न मिळणे, रेशन घेताना आक्षेपार्ह भाषा वापरणे आदी तक्र ारीवरून नागरिकांना रेशन दुकानातून न मिळणाऱ्या रेशन पुरवठ्याची आॅनलाईन माहिती घेतली असता यात नागरिकांना धान्य वितरित केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : दुकानासमोर नागरीकांचा ठिय्या