नाशिक : बहुचर्चित रेशन धान्य घोटाळ्यात वाडीवऱ्हे पोलिसांनी अटक केलेल्या आठही संशयितांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी (दि़१५) संपणार आहे़ या सर्वांना विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश ऊर्मिला फलके-जोशी यांनी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती दिली आहे़ दरम्यान, यातील प्रमुख संशयित व मास्टरमाइंड जितूभाई ठक्कर अद्याप हाती लागलेला नाही़या घोटाळ्यातील संशयित संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, मगन पवार व रमेश पाटणकर हे २९ नोव्हेंबरला वाडीवऱ्हे पोलिसांना शरण आले होते़ या चौघांना न्यायालयाने प्रथम ९ व त्यानंतर १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ रेशन घोटाळ्यासाठी संशयितांनी सुमारे दहा-अकरा बोगस कंपन्या स्थापन केल्या़ यासाठी बँकेत खोट्या कागदपत्रांद्वारे खाती उघडण्यात आली़ दरम्यान, यातील संशयित लक्ष्मण धरमसी पटेल, काशीनाथ पाटील, ज्ञानेश्वर घुले व अरुण घोरपडे हे टप्प्याटप्प्याने शरण आले़ या सर्वांना न्यायालयाने १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ या सर्वांची कोठडीची मुदत संपल्याने या सर्वांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे़ (प्रतिनिधी)
रेशन घोटाळ्यातील संशयित न्यायालयात
By admin | Published: December 15, 2015 12:13 AM