शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

रेशन दुकानदारांच्या संघटनेत फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 1:22 AM

दोन दिवसांपूर्वी रेशन दुकानदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन दुकानदारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा घडवून रेशन दुकानदारांचा १ एप्रिलपासून सुरू होणारा संप स्थगित केल्याचे जाहीर केलेले असतानाच मंत्री बापट यांच्या भेटीसाठी न गेलेल्या रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षांनी मात्र रेशन दुकानदारांचा संप सुरूच राहणार असल्याचे पत्रक प्रसिद्ध केल्यामुळे दुकानदार पेचात सापडले आहेत. दुसरीकडे संप करू पाहणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची तयारी पुरवठा खात्याचे सुरू केल्याने संपाच्या भानगडीत न पडण्याच्या विचारात दुकानदार असल्याने नाशिक जिल्ह्यातील दुकाने सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक : दोन दिवसांपूर्वी रेशन दुकानदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन दुकानदारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा घडवून रेशन दुकानदारांचा १ एप्रिलपासून सुरू होणारा संप स्थगित केल्याचे जाहीर केलेले असतानाच मंत्री बापट यांच्या भेटीसाठी न गेलेल्या रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षांनी मात्र रेशन दुकानदारांचा संप सुरूच राहणार असल्याचे पत्रक प्रसिद्ध केल्यामुळे दुकानदार पेचात सापडले आहेत. दुसरीकडे संप करू पाहणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची तयारी पुरवठा खात्याचे सुरू केल्याने संपाच्या भानगडीत न पडण्याच्या विचारात दुकानदार असल्याने नाशिक जिल्ह्यातील दुकाने सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत १९ मार्च रोजी राज्यातील हजारो रेशन दुकानदारांनी विधीमंडळावर मोर्चा काढून मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. परंतु तत्पूर्वीच पुरवठामंत्री बापट यांनी रेशन दुकानदारांच्या मागण्या अव्यवहारिक व अवाजवी असल्याचे जाहीर केले होते. मात्र मोर्चेकरी दुकानदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यामुळे दुकानदार संघटनेने १ एप्रिलपासून राज्यपातळीवर पुकारलेल्या बेमुदत बंदबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर दि. २७ मार्च रोजी फलटण, सातारा, पुणे, नाशिक, नगर, नांदेड येथील रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाºयांना पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी मुंबईत चर्चेसाठी बोलावले व या बैठकीत रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत येत्या काही दिवसांत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने रेशन दुकानदारांचा नियोजित १ एप्रिलपासूनचा संप स्थगित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते.  अर्थातच पुरवठामंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत रेशन दुकानदारांचा मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी पुढाकार घेणारे आॅल महाराष्टÑ फेअर प्राइज शॉप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर व आॅल महाराष्टÑ स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे संस्थापक व राष्टय अध्यक्ष पुष्कराज (काका) देशमुख हे अनुपस्थित होते.त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत काही जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी संप स्थगित करण्याची केलेली घोषणा न रुचल्यामुळे त्यांनी बुधवारी या संदर्भात पत्रक प्रसिद्धीस देऊन संघटनेने कोणताही संप स्थगित केलेला नसून, या संदर्भातील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच १ एप्रिलपासून संप सुरू राहणार असल्याचे जाहीर केले आहे. कोणत्याही दुकानदारांनी १ एप्रिलपासून ईपीडीएस मशीनचा वापर करू नये, असे म्हटले  आहे.रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्याशी दोनच दिवसांपूर्वी सकारात्मक चर्चा झाली असून, काही मागण्यांबाबत त्यांनी लवकरात लवकर पुन्हा बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दुकानदार संघटनेला दिले आहे. त्यामुळे संप स्थगित करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत जर दुकानदारांच्या मागण्यांवर काही विचार झाला नाही तर मात्र संघटनेकडे संपाशिवाय पर्याय नाही. तशी आगावू कल्पना प्रशासनालाही देण्यात आली आहे.  - निवृत्ती कापसे, जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय