सटाणा : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे रेशन दुकानदारास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बागलाण तालुक्यातील रेशन दुकानदारांनी बंद पाळून प्रभारी तहसीलदार प्रशांत पाटील यांना संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्यासंदर्भात निवेदन सादर केले.आधार सिडिंगचे वर्षानुवर्षे काम रेंगाळल्यामुळे ग्राहक दुकानदारांशी वाद घालत आहेत. त्यामुळेच अशा घटना घडत असून, स्वतंत्र यंत्रणेमार्फत आधार सिडिंगचे काम करावे. तोपर्यंत पॉश मशीनने धान्य वाटपाचा आग्रह धरू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.मालेगाव (जि. वाशिम) येथील रेशन दुकानदार गणेश तिवारी यांनी आधारकार्ड मागितल्यामुळे शिधापत्रिकाधारक इब्राहिम खान याने दुकानदारास बेदम मारहाण केली. शासनाच्या निर्देशावरूनच दुकानदाराने आधारकार्डची मागणी केली होती; परंतु शेख याने त्यास बेदम मारहाण केली. संबंधित सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच तिवारी कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात येऊन नुकसानभरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे. या घटनेने राज्यातील सर्व रेशन दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सन २००५ ,२००९, २०११, २०१६ असे चार वेळा दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांची अचूक व इत्थंभूत माहितीचे अर्र्ज भरून घेतले व वेळोवेळी कार्यालयात जमा केले आहेत. या कामाचे कोणतेही मानधन दुकानदारांना मिळालेले नाही.यावेळी प्रवीण सावंत, राजेंद्र खानकरी, परशुराम अहिरे, देवीदास जाधव, रमेश मुळे, धीरज मोरे, आर. जी. ब्राह्मणकार, मधुकर देवरे, नीलकंठ येवला, आर. एस. मुळे, प्रदीप शेवाळे, शंकर काकुळते, नामदेव ठाकरे, पुंडलिक चौरे, सुदाम टोपले उपस्थित होते.रेशन दुकानदारांनी अनेकवेळा आधारकार्डची माहिती गोळा करून दिलेली असतानाही ती व्यवस्थित आॅनलाइन भरली नाही. यात दुकानदारांचा दोष नसतानाही त्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पॉस मशीनमधील त्रुटींमुळेही दुकानदारांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांची माहिती वेळोवेळी सादर केली आहे. आधार सिडिंगचे काम करताना चुका झाल्याचे वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेले आहे. आधार सिडिंगचे काम पूर्ण व अचूक होईपर्यंत पावतीने धान्य वाटपाची परवानगी द्यावी तसेच मालेगावसारखी घटना इतरत्र घडू नये म्हणून आधार सिडिंगे काम स्वतंत्र यंत्रणेमार्फत करून ते पूर्ण झाल्यानंतरच पॉस मशीनने धान्य वाटप करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मालेगाव येथे रेशन दुकानदारास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सटाण्यात रेशन दुकानदारांचा बंद; तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:45 PM
सटाणा : मालेगाव येथे रेशन दुकानदारास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बागलाण तालुक्यातील रेशन दुकानदारांनी बंद पाळून प्रभारी तहसीलदार प्रशांत पाटील यांना कडक कारवाई करण्यासंदर्भात निवेदन सादर केले.
ठळक मुद्देग्राहक दुकानदारांशी वाद घालत आहेतनुकसानभरपाई देण्यात यावी