लोकमत न्यूज नेटवर्कसुरगाणा : सर्वत्र विजयादशमीला रावणदहनाचे कार्यक्रम होत असताना सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळसोंड, ऊंबरपाडा येथे आदिवासी राजा लंकापती रावणाचा जयजयकार करत त्याच्या ताटीची मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील आदिवासी बांधव अद्यापही आदिवासींच्या रु ढी परंपरा,संस्कृति, चालिरिती जतन करण्याबरोबरच नैसर्गिक साधन संपत्तीचेही संवर्धन करीत आहेत.येथील आदिवासी कलाकार माजी सैनिक शिवा चौधरी हे पन्नास ते साठ वर्षापासून दस-याच्या दिवशी लंकापति राजा रावणाच्या ताटीची (मुखवट्याची) पारंपरिक पद्धतीने पुजाअर्चा करीत आहेत. या पाड्यावर तातापाणी माता कणसरा आदिवासी कला पथक असून हे पथक सापुतारा फेस्टिव्हल मध्ये दरवर्षी सहभागी होत असते. शिवा चौधरी हे बोहाड्याची सोंगे हुबेहुब तयार करतात. त्यांनी तयार केलेले मुखवटे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी गुजरात सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या जाहिराती मध्ये वापरलेले आहेत. आदिवासी भागात दरवर्षी होळी सणा नंतर बोहाडा( भोवाडा)उत्सव साजरा केला जातो. यामध्ये रामायण, महाभारतातील सर्वच मुखवटे नाचवले जातात. त्यामध्ये मानाच्या रावणाची ताटी नाचवणे हे मुख्य आकर्षण असते. पुर्वी आदिवासी समाजात ‘आवण विकेन,पण रावण बांधेन’ असे गर्वाने म्हटले जात असे. याचा अर्थ बोहाड्यातील रावणाच्या ताटीचा लिलाव हा सर्वात मोठ्या रक्कमेचा असतो. बोहाड्यात रावणाच्या ताटीची मिरवणूक काढण्यात येते. शिवा चौधरी यांनी रावणाची ताटी जतन करून ठेवली आहे.आदिवासी बांधव लग्नात किंवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्र मात रावण लीलावर सुंदर नाचकाम करतात. दस-याच्या दिवशी रावणाच्या ताटीची मनोभावे पूजा केली जाते. एकीकडे रावणाला दुष्ट समजले जाते,अंहकार या वाईट गोष्टीचे प्रतिक मानले जात असले तरी आजही उंबरपाडा सारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात समाजाकडून रावणाला आदर्श मानले जात आहे. भविष्यात रावणाचे मंदिर बांधण्याचा मानस आहे.
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात रावणाच्या ताटीची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 5:33 PM
उंबरपाडा : राजा रावणाच्या नावाच्या जयघोष
ठळक मुद्देशिवा चौधरी हे बोहाड्याची सोंगे हुबेहुब तयार करतात. त्यांनी तयार केलेले मुखवटे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी गुजरात सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या जाहिराती मध्ये वापरलेले आहेत