आवर्तन पध्दतीनुसार उपसरपंच गजेंद्र पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी सरपंच योगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी एस. टी. पाटील यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. बोरसे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली.
मानूर एकाच पंचवार्षिकमध्ये रवींद्र बोरसे यांनी सपत्नीक उपसरपंच होण्याचा मान मिळवला आहे. बोरसे यांच्या पत्नी सोनाली बोरसे यांनीही दोन वर्षांपूर्वी उपसरपंच म्हणून कामकाज बघितले आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष ॲड. संजय पवार यांनी बोरसे यांचा सत्कार केला. अंगणवाडी सेविकांनीही उपसरपंचांना शुभेच्छा देऊन उपस्थितांना मास्कचे वाटप केले.
याप्रसंगी जयवंत पवार, बाळासाहेब पवार, संभाजी पवार, जी. व्ही. पवार, बाळू पवार, गजेंद्र पवार, परशुराम पवार, अभिजित पवार, मनोहर पवार, गोपाळराव बोरसे, नंदकुमार बोरसे, विलास बोरसे, ॲड. संजय बोरसे, प्रभाकर बोरसे, तुळशीराम बोरसे, यशोदाबाई पवार, सोनाली बोरसे, लतिका पवार, अनिल गांगुर्डे, योगेश बागुल, गोपाळ पिठे, रंजना कुवर, वैशाली चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आर. बी. स्पोर्ट्स क्लबच्या सदस्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली.
कोट...
तीन वर्षांपासून सुरू असलेला विकासरथ पुढे नेताना स्मशानभूमी नूतनीकरण, को. फाटा पाणीपुरवठा योजना, घंटागाडी योजना आदी महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन. नागरिकांनी सहकार्य करावे.
रवींद्र बोरसे, उपसरपंच, मानूर
050721\05nsk_16_05072021_13.jpg
मानूरच्या उपसरपंचपदी रवींद्र बोरसे यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ.